Kalyan News : मुख्यमंत्री येणार असल्याने दिव्यांगांच्या टपऱ्या हटविल्या; कारवाई विरोधात दिव्यांगांचे आयुक्तांच्या घराबाहेर ठिय्या

Kalyan News :कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने फुटपाथ वरील टपऱ्या हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख

कल्याण : विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ फेब्रुवारीला कल्याणमध्ये येत आहेत. (Kalyan) या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी रस्त्याच्या लगत फुटपाथवर असलेल्या दिव्यांग बांधवांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. या कारवाई विरोधात दिव्यांगांनी (KDMC) केडीएमसी आयुक्तांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. (Maharashtra News)

Kalyan News
Sushma Andhare News: ऊसतोड कामगार मंडळाला कोट्यावधींचा निधी आल्याचा दावा खोटा... सुषमा अंधारेंचा बीडमधील नेत्यांवर निशाणा

कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येणार असल्याने फुटपाथ वरील टपऱ्या हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्री येत असल्याच्या नावाखाली ही बेकायदेशीर कारवाई केली जात आहे. ही कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री हे चांगले काम करीत असताना त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव वापरून ही कारवाई केली जात असल्याचे अपंग महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan News
Electric Shock : पाण्याची मोटर लावताना विजेचा धक्का; महिलेचा मृत्यू

टपऱ्या अधिकृत असल्याचा दावा 

आमच्या टपऱ्या अधिकृत असून महापालिकेच्या अनुदानातून त्या उभारण्यात आल्या आहेत. दिव्यांग बांधव कुठे भीक न मागता टपरीमध्ये व्यवसाय करत स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. महापालिका आयुक्तांनी तत्काळ ही कारवाई थांबवावी यासाठी आंदोलन सुरू केल्याचं असे भोईर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com