राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज ईडी आणि केंद्र सरकारने सरकारी यंत्रणांचा कसा गैरवापर केला याचा पाढाच वाचला. ईडीचा गैरवापर सुरू असून एकाही भाजपच्या नेत्यावर कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आज भाजप विरुद्ध कोणी भूमिका घेत असेल तर लगेच कारवाई होते. देशभरात ६ हजार केसेस दाखल झाल्या आहेत यावरू ईडीचा गैरवापर किती झाला याचा अंदाज येऊ शकतो. ईडीचं बजेट ४०४ कोटीवर गेलं आहे.
आजपर्यंत ईडी कोणाला माहिती नव्हती मात्र गल्लीतल्या लहान मुलालाही ती माहिती झाली आहे. केंद्र सरकारने ८५ टक्के राजकीय लोकांवर ईडीचा वापर केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, १४ मंत्री, २४ खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यावर ईडीची कारवाई झाली असून यात एकही नेता भाजचा नाही. सर्व विरोधी पक्षातील असल्याचं ते म्हणाले.
आज शरद पवार यांनीही पुण्यातील मेळाव्यातून त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निषाणा शाधला आहे. काही लोक राज्याच्या विकासासाठी गेलो असं राज्यभर सांगत असतात, मात्र यात कोणतही तथ्य नाही. काही नेत्यांची चौकशी सुरू होती, ती सत्तेत गेल्यावर ती बंद झाल्याचा टोला लगावत ईडीचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असून पक्षाच काम ८० टक्के सामाजिक व २० टक्के राजकारण असल्याची प्रचिती येतेय. महापूर आला तेव्हा पक्षाचा वैद्यकीय विभाग काम करत होता. दोन तीन वर्षांपूर्वी कोरोनाचं संकट आलं. मात्र स्वतःच्या जिवाची परवा न करता गावागावात जाऊन आपला वैद्यकीय विभाग काम करत होता. या विभागाने आता नवीन योजना काढली आहे. महाराष्ट्रातील घरोघरी तरुणांना आरोग्य मिशन माध्यमातून काम करत आहे. तरुण पिढीने संघर्ष यात्रा लोकांसाठी तरुणासाठी सगळयासाठी, समाजातील कुठल्या ना कुठल्या माध्यमात संघर्ष यात्रा काढली,लोकांचे प्रश्न मांडले,अनेक गोष्टी शिकून जाते, असे उद्गार त्यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र कार्यक्रमात काढले.
आज संपूर्ण देश एका वेगळ्या स्थितीतून जातोय. एका पक्षाच्या हातात सत्ता आहे. तर दुसरीकडे समाजात एका समाजाचा तिरस्कार केला जातोय. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नहेरू इंदिरा गांधी याच्यावर हल्ला केला. त्यांनी स्वतंत्र काळात योगदान दिलं. पण यावर बोलून पंतप्रधान यांनी काय साधल, असा सवाल पवारांनी मोदींना केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.