Maharashtra Politics News
Maharashtra Politics NewsSaam Digital

Maharashtra Politics: ते १६ वर्ष पंतप्रधान होते, तुम्ही तर..., उद्धव ठाकरेंनी कोणत्या पंतप्रधानांवरून भाजपला सुनावलं? जाणून घ्या

Maharashtra Politics News: नेहरू १६ वर्ष सत्तेत होते. भाजपनेतर त्याहीपेक्षा सत्ता उपभोगली आहे. ६० वर्षांपूर्वीच्या नेहरूंच्या चुका काढतात पण भाजप आपण आपल्या आताच्या कार्यकाळात काय केलं हे सांगत नाही, असा घणाघात त्यांनी मोदी आणि भाजपवर केला.

Maharashtra Politics

भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि कॉंग्रेसचं नाव घेतल्याशिवाय पान हालत नाही. दरवेळी पंडित नेहरू इतकी वर्ष सत्तेत होते, मात्र देशासाठी काही केलं नाही, असा प्रचार केला जातो. मात्र नेहरू १६ वर्ष सत्तेत होते. भाजपनेतर त्याहीपेक्षा सत्ता उपभोगली आहे. ६० वर्षांपूर्वीच्या नेहरूंच्या चुका काढतात पण भाजप आपण आपल्या आताच्या कार्यकाळात काय केलं हे सांगत नाही, असा घणाघात त्यांनी मोदी आणि भाजपवर केला.

भारतरत्न कोणाला द्यायचा, किती द्यायचे याचं सूत्र होतं, मात्र मोदींनी ही सर्व सूत्र मोडीत काढली आहेत. कर्पूरी ठाकुर याचं बिहारमध्ये सरकार होतं. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा वंचितांसाठी २६ टक्के आरक्षण आणलं त्याला जनसंघाने विरोध केला.आज २४ वर्षांनंतर मतांसाठी त्यांना भारतरत्न दिलं जात आहे.स्वामीनाथन यांना देशाचं राष्ट्रपती करा ही आमची मागणी होती आता त्यांना भारतरत्न देताय, तशी त्यांच्या अहवालाची अंमलबजावणी देखील केली पाहिजे. येत्या काही दिवसात अनेक भारतरत्न जाहिर होतील. राज्यात असे भारतरत्न देऊन त्या राज्याचा पाठिंबा मिळेल असा त्यांचा भ्रम आहे.

घराणेशीहीत वाईट काय?

आमच्या घराणेशाहीवर बोलता तर बोला. माझी घराणेशाहीत वाईट काय. आमच्या घराणेशाहीला विरोध असेल तर तुमच्या एकाधिकार शाहीला ही आमचा विरोध आहे. आपल्याकडे भाजप एवढे पैसे नाहीत मात्र सोन्यासारखी माणसं आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय.मी त्यांना बोलतो मी कडवट हिंदु आहे त्यावेळी ते म्हणतात तुमच्या आणि भाजपच्या हिंदुत्त्वात फरक आहे.माणसाने धर्म घडवलाय, धर्माने माणून बिघडवू नका. संघाबाबत मला आदर आहे, त्यांनी कुटुंबावर निखारे ठेवून वेळ प्रसंगी मार खावून शिव्या खावून काम केलयं.

Maharashtra Politics News
Sharad Pawar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, १४ मंत्री, ६००० केसेस, ED च्या चौकशीत भाजपचे नेते का नाहीत? शरद पवारांनी सांगितलं खरं कारण

निधी वाटपात केंद्र सरकारकडून राज्यांवर अन्याय झाल्याच्या विरोधात दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीत आंदोलन केलं. आपण जे कर म्हणून १ रुपया देतो त्यातील ७ पैसे केंद्र सरकार महाष्ट्राला देतंय. महाराष्ट्र आहे म्हणून आपण गॅरटीं देताय. जो १ रुपया राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देतो त्यातला ५० टक्के वाटा महाराष्ट्राला मिळायलाच हवा. मुंबईचं खच्चीकरण करायचं महाराष्ट्राला लुळपांगळं करायचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा मिळालाच पाहिजे, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

गडकरींना पक्षात स्थान नाही

गुंडागर्दीही जर राज्यकर्ते थांबवू शकत नाही तर त्यांना खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही. आज जर आम्ही चुकलो तर आमच्यावर टिका केली जाते. पण कुठे चुकलो हेही सांगा. आपण अनेकांना पक्षात घेतलं पण कोणाच्या पक्षाच्या मूळावर उठलो नाही. जिंकल्यानंतर समोरच्याला ठेचणं ही पाश्वीवृत्ती योग्य नाही. हे यांच्या मित्रपक्षाला संपवत आहेत, असं गडकरी म्हणतं आहेत. सध्या पक्षात त्यांनाचं स्थान राहिलं नाही.

Maharashtra Politics News
Sushma Andhare News: ऊसतोड कामगार मंडळाला कोट्यावधींचा निधी आल्याचा दावा खोटा... सुषमा अंधारेंचा बीडमधील नेत्यांवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com