

रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी विरोधक करत आहेत
नार्को टेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केली
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वाद वाढला
राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. रुपाली चाकणकर यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. अंधारेंनी रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करावी आणि त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या राजीनाम्यामुळे पक्षात बदनामी होऊ नये यासाठी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील चाकणकरांना अटक करावी अशी मागणी केली.
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, 'आता अटक करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षपदाचाही राजनामा घेतला पाहिजे. रूपाली चाकणकर तुमच्या डोक्यावर अटकेची तलवार आहे त्याचा विचार करा. आता तटकरे टीम चाकणकर यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. आता घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही अवगत होतात तुम्हाला एक वर्षापासून याची कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला. हा सगळा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. रुपाली चाकणकरांना सहआरोपी केले पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे यावर मी ठाम आहे. त्यांना अटक होणं देखील गरजेचं आहे.'
तसंच, 'सुनेत्रा वहिणींनी आता राज्यातील बहिणींसाठी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, अजितदादांनी कधीही भोंदूगिरीला थारा दिला नाही. अजितदादांनी कधीही गंडेदोरे केले नाहीत. रूपाली चाकणकरांमुळे जर पक्षाची बदनामी होणार असेल तर तातडीने रूपाली चाकणकर यांना तातडीने महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार केलं पाहिजे. जर हे होणार नसेल तर आम्ही अजितदादांचा वारसा जपणारे आहोत असं कोणीही सांगू नये. रूपाली चाकणकर यांच्याकडे ५०० ते ६०० कोटी रुपये आहेत. तटकरे यांच्यासारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे.', असे मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील रूपाली चाकणकर यांना अटक करून सखोल चौकशी करा अशी मागणी केली. 'नुसता राजीनामा देऊन चालणार नाही, आता खरी लढाई सुरू झाली आहे. महासंचालक यांच्याकडे जाताना नाटक केले, गुन्ह्याची चौकशी झाली पाहिजे, पण यात तुम्हीच आरोपी आहात. रूपाली चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करा. त्यांच्यासोबत असणारे सहकार्यांची पण चौकशी करा. निर्लज्जपणे हसून राजीनामा देत आहेत नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि वैयक्तिक कारण असं त्या म्हणत आहेत. ज्या नेत्यांचे त्याच्यासोबत फोटो खरातसोबत आहेत त्या सर्व नेत्यांची चौकशी झाली पाहिजे. मला खूप काय बोलायचं आहे पण वेळ आली की सगळं बोलेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.