Maharashtra Politics: महायुतीला वेध मंत्रिमंडळ विस्ताराचे? आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा

State Cabinet Expansion: विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. याबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही आमदार नाराज असल्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच ओबीसी समाजाची नाराजीही दूर करण्यासाठी काही ओबीसी चेह-यांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट
Maharashtra Politics:  महायुतीला वेध मंत्रिमंडळ विस्ताराचे? आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा
State Cabinet ExpansionSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभेला सामोरे जाण्यापूर्वी राज्यात महायुतीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत.याबाबत तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यासाठी भाजपकडून केंद्रीय पातळीवर बैठकांचं सत्र सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीये.मात्र विधानसभेला अवघे काही महिने राहिले असताना मंत्रिमंडळ विस्ताराचा घाट कशासाठी? याची संभाव्य कारणं काय पाहूया.

मंत्रिमंडळ विस्ताराची घाई आताच का?

आमदारांच्या घरवापसीची राष्ट्रवादी (AP)पक्षाला भीती

स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी शिवसेनेची अधिकच्या मंत्रिपदांची मागणी

भाजपला मंत्रिमंडळातील सोशल इंजिनिअरिंगचं टेन्शन

लोकसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे गेलेल्या राज्यातील भाजप,शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावी तशी छाप मतदारांवर पाडता आली नसल्याचं निकालात स्पष्ट झालं. विशेषतः भाजपने सपाटून मार खाल्ला. हाच पॅटर्न विधानसभेत कायम राहिल्यास त्याचा सर्वाधिक भाजपला बसेलच मात्र त्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या आमदारांना खुश करण्यासाठी आणि त्यांचा स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी आता मंत्रीपदाचा बुस्टर डोस देण्याच्या हालचाली सुरु झाल्यात.

मंत्रिमंडळात 'हे' चेहरे?

भाजपकडून मंत्रिमंडळात कोण?

नितेश राणे - कणकवली

माधुरी मिसाळ - पर्वती,पुणे

मनीषा चौधरी - दहिसर

राणाजगजित सिंह पाटील - उस्मानाबाद

देवयानी फरांदे - नाशिक दक्षिण

आशिष शेलार - वांद्रे पश्चिम

राष्ट्रवादी (AP)कडून मंत्रिमंडळात कोण?

इंद्रनील नाईक - पुसद

संग्राम जगताप - अहमदनगर

अण्णा बनसोडे - पिंपरी

शिंदे गटातील उत्सुक आमदार?

आशिष जैस्वाल - रामटेक

संजय शिरसाट - छ.संभाजीनगर पश्चिम

भरत गोगावले - महाड

यामिनी जाधव - भायखळा

लता सोनवणे - चोपडा

दरम्यान भाजपनं आता ओबीसी कार्ड खेळायचं ठरवलंय.त्यासाठी लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात येऊ शकतं. यासह आमदार संजय कुटे, आमदार पंकज भोयर यांचीही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील सोशल इंजिनिअरींगमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहायचं.

राज्यातील मविआ आणि महायुती आता विधानसभेसाठी सरसावलेत. लोकसभेला केलेल्या चुकांचं मंथन करण्यात आलंय. सत्तेतील महायुतीला आणि विशेषतः भाजपला सत्ता कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करुन आमदारांना मंत्रीपदाची संजीवनी देण्याचा प्रयत्न महायुती करतेय. आता अवघ्या काही महिन्यांसाठी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि त्यातून कोणाचं हित साध्य होणार हे विधानसभेला कळेल.

Maharashtra Politics:  महायुतीला वेध मंत्रिमंडळ विस्ताराचे? आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा
Praful Patel News: विधानसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? प्रफुल पटेलांनी मोठा आकडा सांगितला; म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com