Loksabha Election Exit Poll: महाराष्ट्रात महायुती की मविआची सरशी? सट्टाबाजारात कुणाची तेजी?

Loksabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी सट्टा बाजार तेजीत आहे. विविध जागांचा अन् राज्यातील निकालाचा अंदाज वर्तवला जातोय. काही राज्यातील निकाल धक्कादायक ठरु शकतो. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं दिसतेय. सट्टाबाजारात कुणाची तेजी? पाहूया एक रिपोर्ट
Loksabha Election Exit Poll:  महाराष्ट्रात महायुती की मविआची सरशी? सट्टाबाजारात कुणाची तेजी?
Loksabha Election Exit Poll betting marketsaam tv
Published On

गिरीश निकम, साम प्रतिनिधी

मुंबई : देशभरात 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. एनडीए विजयाचा गुलाल उधळणार की इंडीया आघाडी बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 4 जून 2024 रोजी निकाल येणार आहेत. त्यापूर्वीच सट्टा बाजारातलं वातावरण गरम झालं आहे. आकड्यांचा खेळ तेजीत आला आहे. सट्टा बाजाराने त्यांचा अंदाज वर्तवला आहे. सर्वात आधी पाहूयात महाराष्ट्रात कुणावर सर्वाधिक सट्टा लागलाय.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने 42 जागा जिंकल्या. यावेळी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीए 14 जागा गमावण्याचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय. त्याचवेळी एनडीएच्या जागा कमी झाल्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील मविआला होणार आहे. बेटिंग मार्केटच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात.

नागपुरातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी जिंकतील असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विजयी होतील. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नुकसान होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख येथून निवडणूक जिंकतील.

तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना धक्का बसू शकतो. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी होऊन खासदार होतील,असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव होणार असून मविआचे उमेदवार शाहू महाराज विजयी होऊ शकतात, असा अंदाज आहे.

तर देशात एनडीएचीच सत्ता येणार असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवण्यात येत आहे. मोदींच्याच नावाची सट्टा बाजारात तेजी आहे. मोदी सलग तिस-यांदा पंतप्रधान होणार असा अंदाज वर्तवण्यात येतोय. एनडीएला 350 ते 375 जागा मिळतील असा अंदाज सट्टेबाजांचा आहे. तर काँग्रेसला केवळ 55 ते 70 जागांवर समाधान मानावं लागेल असं सट्टेबाजांना वाटतंय. सट्टे बाजारात एनडीला स्पष्ट बहुमत दिलं असलं जनतेच्या मनात काय हे 4 जूनलाच कळणार.

Loksabha Election Exit Poll:  महाराष्ट्रात महायुती की मविआची सरशी? सट्टाबाजारात कुणाची तेजी?
Lok Sabha Election 2024 Exit Poll LIVE: महायुतीच्या अपेक्षांना सुरूंग लावणारा एक्झिट पोल अंदाज? जाणून घ्या कोणाला किती मिळणार जागा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com