Lok Sabha Exit Poll Results 2024 : कधी कसा, कुठे पाहाल लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल?

Lok Sabha Exit Poll Results 2024: एक्झिट पोल आज 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 पासून सुरू होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागेल हे जाणून घेण्यासाठी राजकारणाची जाण ठेवणारे, राजकीय तज्ञ त्यांच्या उत्सुक आहेत.
Lok Sabha Exit Poll Results 2024 : कधी कसा, कुठे पाहाल लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल?
Lok Sabha Exit Poll Results 2024Saam Tv

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज अखेरचा टप्पा पार पडला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून काय निर्णय लागेल, याचे अंदाज बांधले जात आहेत. आज अनेक वृत्त वाहिन्यांकडून एक्झिट पोल जाहीर केले जात आहेत. साम टीव्हीवरही लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

एक्झिट पोल आज 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 पासून सुरू होणार आहेत. ५४४ जागांसाठी झालेली लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. भाजप विजयाचं हॅट्रिक मिळवण्यासाठी उत्साही आहे. तर मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी 'इंडिया' आघाडीने जोरदार प्रचार केला. महाराष्ट्रासाठी यंदाची लोकसभा महत्त्वाची आहे. राज्यातील सत्ता बदलामुळे लोकसभा निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालंय.

राज्यातील ४८ जागांसाठी मतदान झालं असून याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. निवडणूक आयोग 4 जून रोजी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाच्या सात टप्प्यांसाठी एक्झिट पोलचे आज जाहीर केले जाणार आहेत. कुठे कसे पाहाल.

Saam Live वेबसाईटवर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा एक्झिट पोल तुम्ही न्यूज टीव्ही चॅनलवर थेट पाहू शकता.

YouTube चॅनेल

तुम्ही साम टीव्ही YouTube चॅनेलवर थेट चर्चा आणि देशाच्या मूडचे अचूक अंदाज जाणून घेऊ शकता.

एक्स वर

साम टीव्हीच्या X हँडलवर एक्झिट पोलचे अपडेट्स शेअर केले जाणार असल्यानं तुम्ही तेथे हे अंदाज जाणून घेऊ शकतात.

साम लाईव्ह ॲपवर

तुम्ही अँड्रॉइड आणि iOS वरील साम Live ॲपवर मतदानाच्या सातव्या टप्प्यातील आणि लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे जाणून घेऊ शकतात.

साम Live वेबसाईटवर

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रत्येक प्रमुख उमेदवाराच्या विजय पराजयाबाब माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही https://saamtv.esakal.com/ वर लॉग इन करू शकता.

Lok Sabha Exit Poll Results 2024 : कधी कसा, कुठे पाहाल लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल?
Sanjay Raut News: ४ जूननंतर चक्र उलटं फिरेल, खूप मज्जा येईल; संजय राऊत PM मोदींच्या ध्यानधारणेवरही बोलले!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com