Sanjay Raut News: ४ जूननंतर चक्र उलटं फिरेल, खूप मज्जा येईल; संजय राऊत PM मोदींच्या ध्यानधारणेवरही बोलले!

Loksabha Election Result 2024: लोकसभेचा रणसंग्राम आज संपत असून आता निकालाची उत्सुकता आहे. लोकसभेत विजयाचा गुलाल उधळून कोण सत्तेत येणार? कोणाचा पराभव होणार? याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाची बुलंद तोफ संजय राऊत यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
Sanjay Raut News: ४ जूननंतर चक्र उलटं फिरेल, खूप मज्जा येईल; संजय राऊत PM मोदींच्या ध्यानधारणेवरही बोलले!
Loksabha Election Result 2024: Saamtv

मयुर राणे, मुंबई|ता. १ जून २०२४

देशभरातील लोकसभा निवडणुकांचा धुरळा आता शांत झाला असून राजकीय वर्तुळात निकालाची उत्सुकता लागली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विजयाची हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी धक्का देत नवा पंतप्रधान देणार? याबाबत अंदाज, भाकिते वर्तवली जात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या निकालाबाबत महत्वाचे विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ध्यानध्यारणेवरुनही टोला लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"देशात ४ जूननंतर चक्रे उलटे फिरतील. आम्हाला चिंता नाही, भिती नाही. जनता राहुल गांधींसोबत आहे. इंडिया आघाडी सत्तेत येणार आहे. ४ जूनला बारा वाजल्यानंतर समजेल देशात इंडिया आघाडीचे सरकार येत आहे. पंतप्रधान इंडिया आघाडीचा असेल. संपूर्ण देश आणि आम्ही सर्व राहुल गांधींसोबत आहे. त्यांनी देशभरात ज्या पद्धतीने मेहनत घेतली, त्यावरुन संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

तसेच "निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही तर राजकारणातील सेलिब्रेटींची सोय बघतो. प्रधानमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात स्वतःचे मतदान ठेवले. हे सत्य आहे. असे म्हणत २७ कॅमेरे हे मोदींचे शिष्य आहेत. ध्यानमग्न माणूस कॅमेऱ्याकडे बघत नाही, सगळ्या एँगलने टीव्हीसमोर येत नाही," असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेवरुनही राऊतांनी टीका केली.

Sanjay Raut News: ४ जूननंतर चक्र उलटं फिरेल, खूप मज्जा येईल; संजय राऊत PM मोदींच्या ध्यानधारणेवरही बोलले!
Loksabha Election: देशात कुणाचं सरकार? कोण होणार पंतप्रधान?; काँग्रेसच्या नेत्यानं महाराष्ट्राचा अंदाजही सांगितला

"संविधानाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बनलेले घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री आम्हाला नोटीस पाठवतात. मात्र आम्ही घाबरत नाही. सामनामध्ये सत्याच्या आधारावर लिहले जाते. त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा, आमचे त्यांना आव्हान आहे," असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Sanjay Raut News: ४ जूननंतर चक्र उलटं फिरेल, खूप मज्जा येईल; संजय राऊत PM मोदींच्या ध्यानधारणेवरही बोलले!
Pune Breaking News: शनिवारवाड्यासमोर आढळली बेवारस बॅग! परिसरात खळबळ; बाँम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com