BJP च्या मराठा आमदारांची कानउघाडणी, भाजपकडून लोकसभेच्या पराभवाचं चिंतन-मंथन

BJP Maratha MLA Meeting : आज मुंबईत मराठा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील केवळ मराठा आमदारांचा समावेश होता.
BJP च्या मराठा आमदारांची कानउघाडणी, भाजपकडून लोकसभेच्या पराभवाचं चिंतन-मंथन
BJP Maratha MLA MeetingSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई प्रतिनिधी

मुंबईत भाजपच्या मराठा आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत भाजपचे विधानसभा आणि विधान परिषदेचे फक्त मराठा आमदार उपस्थित होते. बैठकी मराठा आमदारांची कानउघाडी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारने केलेली कामे मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यास मराठा आमदार अयशस्वी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मराठा समाजासाठीची कामे मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यात अपयश, असल्याचं बैठकीत बोललं गेलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीला रवींद्र चव्हाण, प्रविण दरेकर, सुरेश धस, राणा जगजिसिंह, प्रसाद लाड आणि खासदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित होते.

BJP च्या मराठा आमदारांची कानउघाडणी, भाजपकडून लोकसभेच्या पराभवाचं चिंतन-मंथन
BS Yediyurappa: लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुरप्पा यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला दिली स्थगिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजासाठी केलेलं काम समाजापर्यंत पोचवण्यात मराठा आमदार अयशस्वी झाल्याचं बोललं गेलं आहे. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला दिलेला निधी या सगळ्या गोष्टी पोचवण्यात मराठा आमदार मागे राहिल्याचं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी मराठा आमदारांच्या बचावात्मक पवित्र्याचा भाजपला बसला आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आमदारांची कानउघाडणी करण्यात आली आहे.

BJP च्या मराठा आमदारांची कानउघाडणी, भाजपकडून लोकसभेच्या पराभवाचं चिंतन-मंथन
Nagpur Chamundi Explosives Blast Case : 'जोपर्यंत २५ लाखांचा चेक मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार नाही!': धामणा ग्रामस्थ आक्रमक, स्फोटात ६ जणांचा झालाय मृत्यू

भाजपच्या मराठा आमदारांसोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली आहे. मराठा समाजाच्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी बैठकीत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com