BS Yediyurappa: लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुरप्पा यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला दिली स्थगिती

Karnataka News: अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुरप्पा यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे.
लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुरप्पा यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला दिली स्थगिती
BS YediyurappaSaam Tv
Published On

कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोक्सो प्रकरणात माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या अटकेला स्थगिती दिली. येडियुरप्पा यांच्या याचिकेवर सुनावणी करत कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यायालयाने येडियुरप्पा यांना 17 जून रोजी तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीच्या विशेष तपास पथकाने येडियुरप्पा यांना तपासात सहभागी होण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र ते बुधवारी तपासात सहभागी झाले नाही. येडियुरप्पा सध्या दिल्लीत असून त्यांनी तपासात सहभागी होण्यासाठी आणखी वेळ मागितल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सीआयडीने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी करत फर्स्ट फास्ट ट्रॅक कोर्टात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.

लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुरप्पा यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला दिली स्थगिती
Nagpur Chamundi Explosives Blast Case : 'जोपर्यंत २५ लाखांचा चेक मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार नाही!': धामणा ग्रामस्थ आक्रमक, स्फोटात ६ जणांचा झालाय मृत्यू

या वॉरंटविरोधात येडियुरप्पा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली न्यायालयाने त्यांच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या कलम 354 अ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 17 वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वर्षी 2 फेब्रुवारी रोजी एका बैठकीत येडियुरप्पा यांनी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुरप्पा यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला दिली स्थगिती
Nagpur Chamundi Explosives Blast Case : 'जोपर्यंत २५ लाखांचा चेक मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार नाही!': धामणा ग्रामस्थ आक्रमक, स्फोटात ६ जणांचा झालाय मृत्यू

याच वर्षी 14 मार्च रोजी सदाशिवनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर काही तासांनी पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी तत्काळ प्रभावाने पुढील तपासासाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश जारी केले. येडियुरप्पा यांच्यावर आरोप करणाऱ्या 54 वर्षीय महिलेचे गेल्या महिन्यात येथील एका खासगी रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झाले. तर 81 वर्षीय येडियुरप्पा यांनी हे आरोप फेटाळून लावले असून आपण न्यायालयीन लढाई लढणार, असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com