BS Yediyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना होणार अटक? POCSO प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी

Karnataka News: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अटक होऊ शकते. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ, POCSO प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी
BS Yediyurappa NewsSaam TV

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे बेंगळुरू न्यायालयाने गुरुवारी त्याच्याविरुद्ध पोक्सो प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. अशातच त्याला अटक होऊ शकते.

बुधवारी चौकशीसाठी हजर न झाल्याने सीआयडीच्या विशेष तपास पथकाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी करत फर्स्ट फास्ट ट्रॅक कोर्टात धाव घेतली होती. येडियुरप्पा यांनी तपासात सहभागी होण्यासाठी वेळ मागितला होता.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ, POCSO प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी
Fake Female Sub Inspector: तोतया सब इंस्पेक्टरचं वय फक्त २३, कारनामे मात्र ऐकून व्हाल थक्क ... एडीजी, डीजीपीही चक्रावले

भाजपचे दिग्गज नेते येडियुरप्पा, जे पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत, ते सध्या दिल्लीत आहेत. ते परतल्यानंतर या प्रकरणातील तपासात सामील होण्याची शक्यता आहे. वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ, POCSO प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी
NEET-UG 2024 Scam: NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 अ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी आरोप केला आहे की, येडियुरप्पा यांनी यावर्षी 2 फेब्रुवारी रोजी एका बैठकीत तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com