Jalgaon Bribe Case : जप्त वाहन सोडविण्यासाठी मागितली लाच; १० हजार स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक ताब्यात

Jalgaon News : निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत चार महिन्यांपूर्वी एका वाहनावर गुटख्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी वाहन जप्त केले होते
Jalgaon Bribe Case
Jalgaon Bribe CaseSaam tv
Published On

जळगाव : पोलिसांनी जप्त केले वाहन सोडण्यासंदर्भात कोर्टाने आदेश दिले होते. मात्र तक्रादाराचे वाहन सोडण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ठरलेली १० हजाराची रक्कम स्वीकारताना रावेरच्या निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 

Jalgaon Bribe Case
Chhatrapati Sambhajinagar Corporation: धोकादायक होर्डिंगला क्लीन चीट देण्याचा डाव?; मुदत संपल्यानंतर संभाजीनगर मनपाकडून कारवाई नाहीच

रावेर (Raver) तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कैलास ठाकूर (वय ४०) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत चार महिन्यांपूर्वी एका वाहनावर गुटख्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी वाहन जप्त केले होते. हे वाहन सोडविण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तक्रारदाराला वाहन देण्याबाबत आदेशित केले. मात्र निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय कैलास ठाकूर यांनी हे वाहन सोडविण्यासाठी १५ हजारांची लाच (Bribe) मागितली. 

Jalgaon Bribe Case
Dhule Crime : महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पसार झालेला चोरटा ताब्यात

तक्रारदाराने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Jalgaon ACB) तक्रार दिली. याची खातरजमा करत सापळा रचण्यात आला. निंभोरा गावात मरीमाता मंदिराजवळ पीएसआय ठाकूर यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com