Chhatrapati Sambhajinagar Corporation: धोकादायक होर्डिंगला क्लीन चीट देण्याचा डाव?; मुदत संपल्यानंतर संभाजीनगर मनपाकडून कारवाई नाहीच

Chhatrapati Sambhajinagar Hoarding News: मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यभर होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला
Chhatrapati Sambhajinagar News: धोकादायक होर्डिंगला क्लीन चीट देण्याचा डाव?; मुदत संपल्यानंतर संभाजीनगर मनपाकडून कारवाई नाहीच
Chhatrapati Sambhajinagar CorporationSaam TV
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतर राज्यभरात होर्डिग्जचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानुसार संभाजीनगर शहरात लावण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते. मात्र कोणीही याचे गांभीर्य न घेता अहवाल सादर केला नाही. यानंतर मनपाने कोणत्याही प्रकारची कारवाई एजन्सीवर केली नसल्याने त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

Chhatrapati Sambhajinagar News: धोकादायक होर्डिंगला क्लीन चीट देण्याचा डाव?; मुदत संपल्यानंतर संभाजीनगर मनपाकडून कारवाई नाहीच
Nandurbar crime : महिलेची हत्या करत शीर धडावेगळे करत फेकले धरणात; खांडबाऱ्यातील धक्कादायक घटना

मुंबईत घाटकोपरमध्ये (Ghatkopar) महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यभर होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला असून छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील होर्डिंग वाल्यांना नोटीस बजावून ४ जूनपर्यंत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करा असे आदेश दिले होते. मात्र ही मुदत उलटून अनेक दिवस झाल्याने महापालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पालिका (Sambhajinagar) प्रशासनाने सर्व होर्डिंगला क्लीनचीट दिली की काय? अशी शंका शहरवासीयांकडून उपस्थित केली जात आहे. 

Chhatrapati Sambhajinagar News: धोकादायक होर्डिंगला क्लीन चीट देण्याचा डाव?; मुदत संपल्यानंतर संभाजीनगर मनपाकडून कारवाई नाहीच
Dombivali MIDC : डोंबिवली एमआयडीसीतील ४१ कंपन्यांना नोटीस; ८ कंपन्या कराव्या लागणार बंद, अग्नितांडवानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्व्हे

शहरात अनेक जीर्ण इमारतीवर धोकादायक होर्डिंग अजूनही उभेच आहे. दरम्यान शहरातील १४ एजन्सींना नोटीसा पाठवून पालिकेने ४१० होर्डिंग संबंधित इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल आठ दिवसात सादर करावा; अन्यथा होर्डिंग बेकायदा ठरवून ते पाळण्यात येईल आणि संबंधित इमारतीला देखील सील लावण्यात येईल असा कडक इशारा देखील दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com