Dombivali MIDC
Dombivali MIDCSaam tv

Dombivali MIDC : डोंबिवली एमआयडीसीतील ४१ कंपन्यांना नोटीस; ८ कंपन्या कराव्या लागणार बंद, अग्नितांडवानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्व्हे

Dombivali News : गेल्या महिन्यात अमुदान कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टनंतर एमआयडीसी परिसरातील घातक केमिकलच्या कंपन्या स्थलांतरित करण्याचे मागणी जोर धरू लागली
Published on

अभिजित देशमुख 

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये वारंवार आग, ब्लास्ट होण्याच्या घटना घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे या परिसरातील कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून सर्वेक्षणात आतापर्यंत नियमांचे पालन न करणाऱ्या  ३३ कंपन्यांना क्लोजर नोटीसा पाठवण्यात आलय आहेत. तर आठ कंपन्यांना वॉलियनटरी क्लोजर नोटीस पाठवण्यात आल्या. 

Dombivali MIDC
Ujani Dam: उजनीत चार दिवसात ४.८८ टक्क्यांने पाणी साठा वाढला; मुसळधार पावसामुळे धरणात आवक

गेल्या महिन्यात अमुदान कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टनंतर एमआयडीसी परिसरातील घातक केमिकलच्या कंपन्या स्थलांतरित करण्याचे मागणी जोर धरू लागली. या कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेविषयी तसेच प्रदूषणाबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Dombivali) डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांचे धोकादायक, अतिधोकादायक अशी वर्गवारी करत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 

Dombivali MIDC
Nandurbar crime : महिलेची हत्या करत शीर धडावेगळे करत फेकले धरणात; खांडबाऱ्यातील धक्कादायक घटना

८ कंपन्या कराव्या लागणार बंद 

डोंबिवली एमआयडीसी (Dombivali MIDC) परिसरात एकूण साडेसातशे विविध उद्योगाच्या कंपन्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू करत आजमितीला ३३ कंपन्यांना क्लोजर नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसनंतर संबंधित कंपन्यांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तर आठ कंपन्यांना वॉलियनटरी क्लोजर नोटीसा पाठवण्यात आले आहेत. या कंपन्यांना स्वतःहून कंपनी बंद करण्याचे कार्यवाही करायचे असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com