नागपूरमध्ये धामणा येथील चामुंडी एक्सप्लोझीव या फटाक्यांची दारू बनवणाऱ्या कारखान्यात गुरुवारी भीषण स्फोट झाला होता. यात ६ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. तर ५ जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान आज कंपनी मालकाकडून 25 लाखाचा चेक घेतल्याशिवाय आम्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून नागपूर अमरावती मार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे कंपनीच्या गेटबाहेर तणावाचं वातावरण आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मृतदेह सध्या धामणा गावात रुग्णवाहिकेमध्ये आणण्यात आले आहे आहेत. यावेळी ग्रामस्थांनी एकच आक्रोश केला. लेखी स्वरूपात आश्वासन आणि कंपनी मालकाकडून 25 लाखाचा चेक मिळत नाही तोपर्यंत अंत्य संस्कार करणार नाही असा आग्रह गावकऱ्यांनी धरला आहे. ग्रामस्थांनी नागपूर-अमरावती महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण बनलं आहे. मृतदेह असलेल्या रुग्णवाहिका चामुंडा कंपनीच्या गेट समोर नेण्यात आले आहेत.
नागपूर धामणा येथील घटनेमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ 25 लाख रुपये मालकाकडून चेक मिळावा त्याशिवाय मृतदेह उचलले जाणार नाहीत. या कंपन्यांमध्ये दर महिन्याला भेट देऊन सुरक्षेची व्यवस्था केली जाते की नाही याची पाहणी करणे गरजेचं होतं, मात्र याकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. कुठलाही प्रशिक्षण न देता मजुरांकडून काम केलं जात होतं तेही अवघ्या मोजक्या दरात.या सगळ्या प्रकरणाची गांभीर देणे चौकशी केली पाहिजे संबंधितांवर सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यात मंत्र्यांचे नातेवाईक नागपुरात हप्ता वसुली करता, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला.
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते. दरम्यान चामुंडी एक्सप्लोझीव्ह ब्लास्ट प्रकरणी कंपनीचे मालक शिव शंकर खेमका यांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संचालक आणि व्यवस्थापकविरुद्ध २८६, ३०४-अ आणि ३३८ मनुष्यवध, मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.