सागर निकवाडे
नंदुरबार : आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनी आहेत. या जमिनीवर बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारणी करण्याचा प्रयत्न मोबाइल कंपनीकडून करण्यात येत आहे. यासाठी कंपनीकडून सर्व्हे करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यात आदिवासींच्या जमिनीवर खासगी कंपनीकडून सर्वे करण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रकारा बाबत शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतींना माहिती नाही. परस्पर मोबाईल कंपनी सर्वे करून मोबाईल टावर उभारण्याचं तयारीत आहे. त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले असून मोबाईल कंपनी आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
आंदोलनाचा दिला इशारा
मोबाईल कंपन्यांकडून हा केला जाणारा सर्वे (Forest department) वन विभागाच्या मार्फत होत आहे. तर या सर्व बाबत ग्रामपंचायत आणि वनहक्क समिती यांना कुठल्याही माहिती न देता परस्पर सर्वे होत आहे. यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेने आंदोलनाच्या इशारा दिला आहे. शासनाने तात्काळ ये सर्वे थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा सत्यशोधक शेतकरी सभेने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.