सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपला या मतदारसंघातील बंड शमवण्यात यश आले आहे. सम्राट महाडकांनी निर्माण केलेले आव्हान शमवण्यात अखेर भाजपाला यश आलं आहे. सम्राट महाडिकांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील माघार घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर शिराळा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका देखील स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईनंतर सम्राट महाडकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेऊन सत्यजित देशमुखांच्या जाहीर पाठिंब्याबाबत मेळावा देखील घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे शिराळा मतदारसंघातले भाजपाचं बंड शमल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध भाजप अशी एकास एक लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. भाजपने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली. भाजपकडून उमेदवारी डावल्यानंतर महाडिक समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पेठ नाका येथे पार पडलेल्या महाडिक समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सम्राट महाडिक यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. तर इस्लामपूर मतदारसंघातून देखील महायुती उमेदवाराविरोधात नाराजांना एकत्रित करत उमेदवारी देण्याचाही महाडिक बंधूंनी निर्णय घेतला होता. 'खेळखंडोबा केल्या शिवाय राहणार नाही.' असा इशारा सम्राट महाडीकांनी दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.