Assembly Election 2024: नाशिकवरुन महायुतीत नाराजीनाटय, मविआतही टोकाचा संघर्ष; काँग्रेसने दिला सांगली पॅटर्नचा इशारा

Maharashtra Assembly Election 2024: नाशिक जिल्हयातील १५ मतदारसंघातून २० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये अनेक जागांवरुन महायुतीसह महाविकास आघाडीत कलह पाहायला मिळत आहे.
Assembly Election 2024: नाशिकवरुन महायुतीत नाराजीनाटय, मविआतही टोकाचा संघर्ष; काँग्रेसने दिला सांगली पॅटर्नचा इशारा
Maharashtra Politics Saam tv
Published On

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. गुरूपुष्यामृत योग साधत विधानसभा अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गन भुजबळ, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, उदय सांगळे, धनराज महाले, माकपच्या जे.पी. गावितांसह जिल्ह्यातून २० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक जिल्हयातील १५ मतदारसंघातून २० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये अनेक जागांवरुन महायुतीसह महाविकास आघाडीत कलह पाहायला मिळत आहे.

Assembly Election 2024: नाशिकवरुन महायुतीत नाराजीनाटय, मविआतही टोकाचा संघर्ष; काँग्रेसने दिला सांगली पॅटर्नचा इशारा
Maharashtra Politics: जागावाटपात शिंदेंची तडजोड नाही? सर्व्हेविरोधात एल्गार? दिल्लीवारीतून जागांचा तिढा सुटणार?

महायुतीमधील नाशिकच्या निफाड मतदार संघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे, मात्र या जागेवर भाजपचे यतीन कदम इच्छुक आहेत. काल दिवसभर यतीन कदम आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते देवगिरी बंगल्यावर तळ ठोकून होते. दिल्लीवरून आल्यानंतर रात्री अजित पवार यांन या कार्यकर्त्यांची भेट घेतली.यावेळी निफाड मतदार संघात करण्यात येणाऱ्या क्विक सर्वेचा अहवाल आल्यानंतर उमेदवार जाहीर करू, अशी ग्वाही अजित पवार यांची नाशिकच्या कार्यकर्त्यांना दिली.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप बनकर या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. मात्र मागील दोन सर्वे मध्ये त्यांचं नाव पिछाडीवर असल्याने यतीन कदम यांच्या नावाचा केला विचार केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच विद्यमान आमदारांना अजित पवार यांनी एबी फॉर्म दिले आहेत. मात्र याच निफाड मतदार संघाचा एबी फॉर्म अजित पवार यांनी राखून ठेवला आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महायुतीत नेमका काय फैसला होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Assembly Election 2024: नाशिकवरुन महायुतीत नाराजीनाटय, मविआतही टोकाचा संघर्ष; काँग्रेसने दिला सांगली पॅटर्नचा इशारा
Maharashtra Politics: उमेदवारीवरुन मनसेत भूकंप! प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम; भांडुपमध्येही राज ठाकरेंना धक्का

नाशिक मध्य मतदारसंघावरून महाविकास आघाडीत संघर्ष सुरू आहे. नाशिक मध्यची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने काँग्रेसचे नेते नाराज आहेत. प्रदेशाध्यक्षांवर नाराजी व्यक्त करत स्थानिक नेत्यांनी शहरातील काँग्रेस कमिटी कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. याप्रकरणी आक्रमक झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आज निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या मेळाव्यातून स्थानिक नेते भूमिका जाहीर असून नाशिकमध्ये लोकसभेचा सांगली पॅटर्न राबवण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तयारी आहे. त्यामुळे आजच्या निर्धार मेळाव्यात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Assembly Election 2024: नाशिकवरुन महायुतीत नाराजीनाटय, मविआतही टोकाचा संघर्ष; काँग्रेसने दिला सांगली पॅटर्नचा इशारा
Maharashtra Politics: 'निवडणुकीत पैशांचा महापूर, महायुतीकडून ४ हजार कोटींचा चुराडा..' मविआच्या नेत्याचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com