PM Narendra Modi: PM मोदींची तोफ धडाडणार, महाराष्ट्रात 5 दिवसांत 12 सभा होणार; कुठे आणि कधी?
PM Narendra ModiSaam TV

PM Narendra Modi: PM मोदींची तोफ धडाडणार, महाराष्ट्रात 5 दिवसांत 12 सभा होणार; कुठे आणि कधी?

PM Narendra Modi Maharashtra Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांची तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. राज्यात पीएम मोदी तब्बल १२ सभा घेणार असून पुण्यातही स. प. महाविद्यालयाच्या ग्राउंडवर त्यांची सभा होणार आहेत.
Published on

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पीएम मोदींची राज्यात तोफ धडाडणार आहे. राज्यामध्ये पीएम मोदींच्या पाच दिवसांमध्ये १२ सभा होणार आहे. ८ नोव्हेंबरपासून पीएम मोदींच्या सभेला सुरूवात होणार आहे. राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी पीएम मोदी या सभा घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांची तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. राज्यात पीएम मोदी तब्बल १२ सभा घेणार असून पुण्यातही स. प. महाविद्यालयाच्या ग्राउंडवर त्यांची सभा होणार आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ १२ नोव्हेंबर रोजी पुण्यात त्यांची ही सभा होणार आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून पीएम मोदी यांच्या प्रचारसभा राज्यभरात सुरू होणार आहे.

४ दिवसांत पीएम मोदींच्या ९ प्रचारसभांचे नियोजन राज्यभरात करण्यात आले आहे. पीएम मोदींच्या सभांचा श्रीगणेशा उत्तर महाराष्ट्रातून होणार असून ८ नोव्हेंबर रोजी मोदींची धुळे आणि नाशिकला सभा होईल. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी नांदेड, अकोला, चिमूर येथे त्यांची सभा होणार आहे. १२ नोव्हेंबरला पुणे येथे सभा होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी सोलापूर आणि कोल्हापूर येथे सभा होईल. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई येथे १४ नोव्हेंबर रोजी त्यांची सभा होणार आहे.

PM Narendra Modi: PM मोदींची तोफ धडाडणार, महाराष्ट्रात 5 दिवसांत 12 सभा होणार; कुठे आणि कधी?
Maharashtra Politics : ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात, भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा आणि रोड शोचे नियोजन केले जात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

PM Narendra Modi: PM मोदींची तोफ धडाडणार, महाराष्ट्रात 5 दिवसांत 12 सभा होणार; कुठे आणि कधी?
Maharashtra Politics: गोपाळ शेट्टी पक्ष हिताचे निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com