Maharashtra Politics : ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात, भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

Maharashtra Assembly Election 2024 : ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात, उल्हासनगरात भाजपा जिल्हाध्यक्षांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याची चर्चा होत आहे.
Cm Eknath Shinde
Cm Eknath Shinde Saam Tv
Published On

ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात, असं खळबळजनक विधान भाजपाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. माफी मागा, अन्यथा भाजपचं काम करणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. उल्हासनगरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

उल्हासनगरात आयोजित भाजपा आणि साई पक्षाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे भाषण करत होते. यावेळी उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीचा दाखला देत असतानाच अचानक त्यांनी "आता कुणीही गद्दार राहिलेलं नाही, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे. ज्यांना आम्ही काल गद्दार म्हणत होतो, ते आज आमच्या पक्षात सहभागी झाले आहेत, त्यांना आज आम्ही खुद्दार म्हणतो. काळाने हा बदल केला आहे", असं प्रदीप रामचंदानी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये मोठी खळबळ माजली.

भाषण संपल्यानंतर रामचंदानी यांना याबाबत विचारलं असता, "मी तसं बोललोच नसून विरोधक ज्यांना गद्दार म्हणतात, ते मुख्यमंत्री बनतात. ते गद्दार नव्हे, तर खुद्दार असतात" असं मी म्हटल्याचा दावा रामचंदानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे.

"माफी मागा, अन्यथा भाजपचं काम करणार नाही!"

उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झालीय. ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, असं वक्तव्य जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात केलं. या वक्तव्यानंतर उल्हासनगरमधील शिवसैनिक आक्रमक झाली असून जोपर्यंत जिल्हाध्यक्ष रामचंदानी हे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजपा आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचं काम करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतलीय. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com