Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Nashik Politics: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. ठाकरेसेनेचा खासदार शिंदेसेनेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे ठाकरेंना धक्का देणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर
Eknath Shinde And Uddhav ThackeraySaam TV Marathi News
Published On

Summary -

  • नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड

  • एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

  • नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या कार्यक्रमात खासदार राजाभाऊ वाजे

  • कार्यक्रमानंतर ठाकरे गटात राजकीय चर्चांना उधाण

अभिजीत सोनावणे, नाशिक

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये ठाकरेसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे शिंदेसेनेच्या व्यापासपीठावर दिसल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या.

ठाकरेसेनेचे नेते अरविंद सावंत नाशिकमध्ये असताना देखील राजाभाऊ वाजे हे शिवसेनेच्या व्यासपीठावर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आज दुपारीच ठाकरेंचा खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे हे शिंदेंच्या कार्यक्रमात दिसल्यामुळे दोघेही शिंदेसेनेत जाणार की काय? असे म्हटले जात आहे.

नाशिकच्या गंगापूर गावात शिंदेसेनेचे उपमहापौर विलास शिंदे यांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला थेट ठाकरेंच्या खासदाराने हजेरी लावली. ठाकरेसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे हे शिंदेसेनेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे नाशिकमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर
Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंकडून मोठा झटका, बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह सोडली साथ

खासदार श्रीकांत शिंदेच्या सोबत राजाभाऊ वाजे यांनी विकासकामांचं उद्घाटन केले. त्यामुळे ते शिंदेसेनेत जाणार की काय अशी आता चर्चा सुरू झाली आहे. पण 'मी या विकासकामांना निधी दिला आहे. विलास शिंदेंनी मला कार्यक्रमासाठी बोलावलं म्हणून मी आलो. ऑपरेशन टायगर आणि आजच्या कार्यक्रमाचा संबंध नाही.', असे स्पष्टीकरण राजाभाऊ वाजे यांनी दिलं. या कार्यक्रमानंतर अरविंद सावंत यांना भेटणार असल्याचे देखील वाजे यांनी सांगितले.

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर
Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, 'दादा भुसे पालकमंत्री असताना मला काही निधी दिला होता. त्यातील काही निधी मी आमचे तत्कालिक महानगर प्रमुख तथा माझे स्नेही विलास अण्णा शिंदे यांच्या प्रभागात दिला. त्या निधीतून झालेल्या विकास कामाच्या उद्घाटनाला विलास अण्णा यांनी आमंत्रित केले. या विकासकामात माझं काम फक्त वाढप्यायची भूमिका होती. त्यामुळे सर्व श्रेय अण्णांचे आहे. बाकी मी माझ्या विचारांशी कायम एकनिष्ठ आणि ठाम आहे. म्हणून कोणताही गैरसमज असू नये.'

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com