Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

MLA Bachchu Kadu: एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना विदर्भात पक्ष वाढीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे . यामुळे विदर्भातील भाजपच्या राजकारणात तणाव वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांवर परिणाम होऊ शकतो.
MLA Bachchu Kadu:
EKNATH SHINDE GIVES BIG RESPONSIBILITY TO BACHCHU KADU, BJP MAY FACE PRESSURE IN VIDARBHAsaam tv
Published On
Summary
  • एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना मोठी जबाबदारी दिली.

  • विदर्भात शिवसेना मजबूत करण्याची जबाबदारी कडूंवर.

  • शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेत.

राज्यातील राजाकारणात मोठ्या घडामोड घडत आहेत. महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झालाय. दुसऱ्या बाजुला शिंदे गट शिवसेनेनेकडून ऑपरेशन टायगर लॉन्च करत आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. ठाकरेंच्या खासदार त्यांच्या रडार आहेत. त्याचदरम्यान शिंदेंनी विदर्भात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विदर्भात भाजपचं टेन्शन वाढण्याच शक्यता आहे.

MLA Bachchu Kadu:
भाजप नगरसेवकांच्या घरावर बुलडोझर फिरणार? मनपाच्या नोटीसनंतर नेत्यांची धडधड वाढली

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी पुन्हा बसवणार. एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं विधानं करून राजकीय आखाड्यात हुंकार भरणाऱ्या बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली आहे. शिवसेनेचे विधान परिषद आमदार बच्चू कडू यांना विदर्भात पक्ष वाढीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे.

MLA Bachchu Kadu:
मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाची चर्चा? फडणवीसांनी सांगितली पार्थ पवारांच्या भेटीची आतली गोष्ट

नुकत्याच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेते पदी नियुक्ती केली आहे. बच्चू कडूंना विदर्भात शिवसेना पक्षाचे संघटन, शाखा बांधणी व पक्ष वाढीसाठी ही जबाबदारी देण्यात आले आहे. शिवसेना पक्षात प्रवेश करताच बच्चू कडू यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी आणि मोटबांधणीचे कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजताही जनतेसाठी दार उघडतात. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, अशी त्यांची भावना असते. त्यांच्या ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा, असे सर्वांनाच वाटते. जर आजही सर्वेक्षण केले, तर पुन्हा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हवेत, असेच लोक म्हणतील, असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. त्यांच्या विधानावर भाजपनं तिखट पण सावध प्रतिक्रिया दिली होती. आता त्याच बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. विदर्भात सेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

भाजपचं टेन्शन वाढणार

विदर्भात भाजपचं ताकद अफाट आहे, हा भाग प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) विदर्भात मोठा विजय झाला होता. आता या विदर्भात एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवत आहेत. दरम्यान अनेक विधीमंडळ आणि स्थानिक नेत्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीत प्रवेश केल्यामुळे पक्षाचे संघटन ग्रामीण भागात मजबूत झालंय.परंतु आता आमदार बच्चू कडू यांना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेते पदी नियुक्त केलंय. त्यांच्या मार्फत ते पक्षाच संघटन,शाखा बांधणी करणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातून येणारे बच्चू कडू विदर्भातील मातब्बर नेते आहेत. युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणलेत. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर बच्चु कडू यांनी आपली राजकीय ताकद वापरत सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले. "आमदाराची राहुटी" हा उपक्रम राबवत तालुकास्तरावरील ४७ विविध विभागांच्या ३५ योजना राबविण्यासाठी १५ दिवसात अख्खा तालुका पिंजून काढला होता. बच्चू कडूंना "अपंगांचे मसीहा" म्हणून ओळखले जातं.

दरम्यान २०२४ मध्ये झालेल्या विधानसभे निवडणुकीत त्यांच्या प्रहार पक्षाने ३८ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी त्या भागातून त्यांना १.५५ टक्के मते मिळवली. आता शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्यामुळे त्यात सुधारणा होता भाजप आणि काँग्रेससाठी आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावावरून म्हणजे नागपूर येथून पंतप्रधान मोदींच्या गावापर्यंत म्हणजेच गुजरातमधील वडनगरपर्यंत काढलेली "आसूड यात्रा" खूप गाजली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com