Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंकडून मोठा झटका, बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह सोडली साथ

Operation Tiger: मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच मोठा झटका बसला. बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह साथ सोडली असून ते आज धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंकडून मोठा झटका, बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह सोडली साथ
Eknath Shinde And Uddhav ThackeraySaam TV Marathi News
Published On
  • मुंबईत मोठी राजकीय घडामोड

  • उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

  • बड्या नेत्याने पक्षाची सोडली साथ

  • ५०० कार्यकर्त्यांसह करणार शिंदेगटात प्रवेश

  • अनिल परब यांचे निकटवर्तीय

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ही मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी करत उद्धव ठाकरेंना मातोश्रीच्या अंेगणातच मोठा झटका दिला. बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून आज संध्याकाळी ते ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवसेना शाखा क्रमांक ९२ चे शाखाप्रमुख रामशरण चांदेलिया हे शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. रामशरण चांदेलिया हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. ५०० हून अधिक समर्थकांसह आज त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंकडून मोठा झटका, बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह सोडली साथ
Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

अंधेरीतील शेरे पंजाब ग्राउंड येथे रामशरण चांदेलिया हे ५०० कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. 'ऑपरेशन टायगर' मोहिमेला शिनवसेना शिंदेसेनेला नवे बळ मिळणार आहे. या पक्षप्रवेशामुळे वांद्र्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी होऊन शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंकडून मोठा झटका, बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह सोडली साथ
Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com