

जळगावच्या बोदवड बाजार समितीत सत्तांतर
एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा धक्का
बोदवड बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या जयपाल बोदडे यांची बिनविरोध निवड
गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली बोदवड बाजार समितीवर भाजपची सत्ता
जळगावच्या बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला. या निवडणुकीत बोदवड बाजार समितीची सत्ता खडसेंच्या हातातून निघून गेली. खडसेंचे १७ संचालक असताना देखील भाजपने येथे बाजी मारलीत या बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे जयपाल बोदडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ तर भाजपचा एकमेव संचालक असलेल्या बाजार समितीत झालेल्या या सत्तांतरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या समन्वयातून बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे.
सभापतीपदासाठी जयपाल बोदडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ तर भाजपचा एक असे एकूण १८ संचालक निवडून आले होते. त्यावेळी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सुधीर तराळ यांची सभापतीपदी निवड झाली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव तराळ यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर याठ सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले. या बाजार समितीवर भाजपने झेंडा फडकावला.
गिरीश महाजन यांच्या कणखर आणि कुशल नेतृत्वाखाली विधान परिषदेचे आमदार नंदू भाऊ महाजन आणि भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते जितू भाऊ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे यांच्या स्थानिक सहकार्याने आणि समन्वयाने कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड येथे ऐतिहासिक सत्तापालट झाली आहे. बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत जयपालभाऊ बोदडे यांचा सभापतीपदासाठी एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गेल्या साडेतीन वर्षांच्या आधी राष्ट्रवादी पवार गटाचे १७ संचालक आणि भाजपाचा १ असे एकूण १८ सभासद निवडून आले होते आणि एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सुधीर तराळ हे सभापती झाले होते मात्र तब्येतीच्या कारणास्तव तराळ यांनी पदाचा राजीनामा दिला. दीडवर्षांसाठी गिरीश महाजन यांच्या जादूने खडसेंना मोठा धक्का देत भाजपाचे एकमेव सभासद जयपाल बोदडे याची सभापतीपदी वर्णी लागली. सभापती झाल्यानंतर गिरीश महाजन यांचे आभार मानले आणि सांगितले की, मी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहिल. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट केला जाईल. शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे यालाच आमचे पहिले प्राधान्य असेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.