भाजपच्या मोर्चावर ताईंनी बाटली फेकून मारली; 'त्या' घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

girish mahajan news : मुंबईत आयोजित भाजपच्या महिला मोर्चावर एका महिलेने संताप व्यक्त केला. याव आता मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
girish mhajan
girish mhajan news Saam tv
Published On
Summary

भाजपच्या मोर्चावर महिलेचा संपात

महिलेने मोर्चावर बाटली फेकून मारल्याचा मंत्री महाजन यांचा आरोप

मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता

भाजपने मुंबईत काढलेला मोर्चा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलाय. कालच्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. महिलेने विचारलेला जाब सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, 'महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून मुंबई, दिल्ली, लखनौमधील महिलांमध्ये संताप होत आहे. कालच्या मोर्चातही अनेक महिला होत्या. या मोर्चामुले वाहतूक कोंडी होत होती. यामुळे एक भगिनी समोर आली. ती महिला वाटेत तसं बोलत होती. तिने बोलायला नको पाहिजे होते. पोलिसांना तक्रार द्यायला हवी होती. परंतु ही महिला पोलिसांशी नको त्या भाषेत बोलली. पोलीस संयमाचा भाषेत बोलले'.

girish mhajan
Women reservation bill: पंतप्रधान मोदी कडाडले; विरोधकांना कडक शब्दांत इशारा, कॅबिनेट बैठकीत काय काय म्हणाले?

'महिलेने पाण्याची बाटली देखील फेकून मारली. त्यामुळे आमच्या भगिनी संतप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्या १० ते १५ मिनिटांनी निघाल्या. महिलेकडून राग व्यक्त होत होता. मोर्चा आणि आंदोलनात असे प्रकार होतात. त्यांना राग होता तर तक्रार द्यायला हवी होती. आता आम्ही पुढील वेळी काळजी घेऊ. सायंकळाची वेळ होती. मोर्चा रात्रीच्या वेळी निघू शकणार नाही. नियोजन चुकलं नाही, असे महाजन यांनी सांगितले.

girish mhajan
Women Reservation bill : महिला आरक्षणावर बोलताना पंतप्रधान मोदींची विरोधकांना खुली ऑफर; म्हणाले, मी ब्लँक चेक देतो, पण...

'महिलेने असंसदीय भाषा वापरली. मोर्चा हा महिलांच्या हक्कासाठी होता. त्या तक्रार करू शकल्या असत्या. पोलिांकडे जाऊन तक्रार केली असती. परंतु त्यांनी चुकीच्या भाषेत राग व्यक्त केलाय. या आधी देखील मोर्चे झाले. त्याचा लोकांना त्रास झाला. परंतु आमचा पहिल्यांदा मोर्चा नव्हता. आम्ही संयम दाखवलाय, असेही महाजन यांनी पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com