Sharad Pawar News: 'मुख्यमंत्री - राहुल नार्वेकरांची भेट म्हणजे शंकेला वाव...' आमदार अपात्रतेच्या निकालाआधी शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar News: "ज्यांच्यासमोर केस मांडली जात आहे. ज्यांना निकाल द्यायचा आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळं संशयाला जागा आहे. त्यांनी प्रतिमा जपली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar news
Sharad Pawar news saam tv
Published On

Sharad Pawar Press Conference:

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने काल महत्वपूर्ण निकाल दिला. सुप्रीम कोर्टाकडून दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या निकालाने सामान्यांना आधार मिळाल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

"काल सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल झाला. बिल्कीस बानो प्रकरणात हा निकाल आहे. त्याची पार्श्वभूमी गुजरातची आहे. कोर्टानं स्पष्ट भूमिका घेतली. सामान्य माणसाला आधार द्यायचं काम या निर्णयानं मिळेल अशी अपेक्षा आहे," असे शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र सरकारही प्रकरण गांभीर्याने घेईल..

तसेच याबाबत पुढे बोलताना "गुजरात सरकारनं आरोपींना सोडलं होतं. महाराष्ट्र सरकारनं त्याचा निर्णय घ्यावा असं कोर्टाने सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारही त्याची गांभीर्यानं नोंद घेईल अशी अपेक्षा आहे.." असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar news
Beed Crime News: धक्कादायक! 8 महिन्यांच्या चिमुकलीला पोत्यात भरलं अन् रस्त्यावर फेकलं; घटनेमुळे परिसरात खळबळ

आमदार अपात्रतेच्या निकालावरुन मोठे विधान..

यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राहुल नार्वेकरांच्या भेटीवरुन महत्वाचे विधान केले 'ज्यांच्यासमोर केस मांडली जात आहे. ज्यांना निकाल द्यायचा आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळं संशयाला जागा आहे .त्यांनी प्रतिमा जपली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

वंचितचा महाविकास आघाडीत समावेश?

दरम्यान, शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aaghadi) प्रवेशाबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली. "आज दिल्लीत महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याची भूमिका मांडू," असे ते म्हणाले.

आमची भूमिका क्लिअर..

तसेच "आमची भुमिका क्लिअर आहे की वंचीतला सोबत घेण्यात यावे. ज्यावेळी मी इंडिया आघाडीच्या (India Aaghadi) बैठकीत सहभागी होईल त्यावेळी वंचितला सहभागी करुन घेण्याबाबत निर्णय घ्यावा याबाबत भुमिका मांडेल," असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

Sharad Pawar news
Ahmednagar Corporation : प्रत्येक चौकात लागणार कर थकबाकीदारांची यादी; अहमदनगर मनपा प्रशासनाचा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com