Uttarakhand Accident: नव्या गाडीची ट्रायल सुरू असताना भीषण अपघात; रेंजर, डेप्युटी रेंजरसह चौघांचा मृत्यू

Chilla Road Accident: ऋषिकेशजवळील चिलामार्गावर शक्ती कालव्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे वाहन पडले. या अपघातात रेंजर, डेप्युटी रेंजरसह चार लोकांचा मृत्यू झाला.
Chilla Road Accident
Chilla Road AccidentSaamtv

Uttarakhand Accident:

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ऋषिकेशजवळील चिलाजवळ शक्ती कालव्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे वाहन पडले. या अपघातात रेंजर, डेप्युटी रेंजरसह चार लोकांचा मृत्यू झाला. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

डेहराडून जिल्ह्यातील ऋषिकेश भागात सोमवारी, ८ जानेवारी रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. राजाजी व्याघ्र प्रकल्पातील चिल्ला रेंजमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनाची चाचणी सुरू असताना मोठा अपघात झाला. या अपघातात रेंजर आणि डेप्युटी रेंजरसह चार अधिकार्‍यांचा मृत्यू झाला, तर 5 कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने वाहन पलटी झाले, त्यामुळे वाहनात बसलेले दोघे अधिकारी थेट चिला शक्ती कालव्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हिमांशू गुसैन, राकेश नौटियाल, अमित सेमवाल, अश्विनी आणि अंकुश हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर ऋषिकेश येथील एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chilla Road Accident
Chatrapati Sambhajinagar : शाळेच्या बोर्डारील छत्रपती संभाजीनगर नावावर लावले काळे; गावात तणाव

हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. चाचणीदरम्यान कंपनीचा स्वतःचा ड्रायव्हर कार चालवत होता. मुख्य वनसंरक्षक अर्धा अनूप मलिक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना या घटनेची माहिती दिली. सध्या या अपघातामागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

Chilla Road Accident
Ravindra Waikar Case: ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड, सकाळपासून झाडाझडती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com