Ahmednagar Corporation : प्रत्येक चौकात लागणार कर थकबाकीदारांची यादी; अहमदनगर मनपा प्रशासनाचा निर्णय

Ahmednagar News : अहमदनगर मनपाने मालमत्ताधारकांना लोकअदालतीच्या निमित्ताने ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती.
Ahmednagar Corporation
Ahmednagar CorporationSaam tv
Published On

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगरला १ लाखांच्या पुढील थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा महापालिका (Ahmednagar) आयुक्तांनी आदेश दिला आहे. विशेष म्हणजे करबुडव्यांचे नावांचा फ्लेक्स नगरच्या चौकाचौकांत लावण्याचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला आहे. (Tajya Batmya)

Ahmednagar Corporation
Chatrapati Sambhajinagar : शाळेच्या बोर्डारील छत्रपती संभाजीनगर नावावर लावले काळे; गावात तणाव

अहमदनगर मनपाने मालमत्ताधारकांना लोकअदालतीच्या निमित्ताने ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. दहा दिवसांत या योजनेचा ४ हजार ४१३ जणांनी लाभ घेत थकबाकीपोटी मनपाकडे ६ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर शास्तीमाफीच्या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली. मात्र अद्यापही अनेकांनी कर्ज भरला नसल्याने कर (Tax) वसुलीच मोठं आव्हान पालिके समोर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ahmednagar Corporation
Sugarcane Crop : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून पंधरा लाख उसाची रोपे; शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध

थकीत कर वसुलीसाठी अहमदनगर महापालिकेने ७५ टक्के शास्ती माफी देऊनही महिनाभरात अवघी साडेनऊ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे आता महापालिका करबुडव्यांच्या नावांचे शहरात फ्लेक्स लावणार आहे. याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी वसुली विभागाला आदेश दिले आहेत. शहरात १ लाखांपुढे थकबाकी असणाऱ्यांची तब्बल २ हजार ७१२ इतकी संख्या आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com