अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव संगमनेर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरीकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केलेय. नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात चक्क चूल पेटवली आहे. रस्त्यावर चूल पेटवून त्यांनी यात भाकरी बनवली आहे. तसेच ही भाकरी अधिकाऱ्यांना खाण्यासाठी दिलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव संगमनेर महामार्गावर रत्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यातून वाट काढताना अपघात होऊन आतापर्यंत अनेकांना आपला जिव गमवावा लागलाय. झगडेफाटा ते रांजणगांव देशमुख रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरीकांनी अनोखं आंदोलन केलं.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये त्यांनी लाकडी चुरा आणि चुल्हीसाठी लागणारं सरपन आणुन टाकलं. तसेच चुली प्रमाणे त्यावर आग लावत तवा ठेवून सुंदर भाकरी बनवल्यात. तसेच लवकरात लवकर या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्या फक्त अहमदनगरमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरात आहेत. खासदार गवळींच्या निवासस्थानासमोर असलेल्या रस्त्याला देखील खड्डे पडले आहेत. याकडे नगर परिषदेनं दुर्लक्ष केलंय. यवतमाळ येथील समर्थवाडीमधील खासदार भावना गवळी यांचे निवासस्थान आणि जनसंपर्क कार्यालय आहेत. अगदी दरवाज्यासमोरच रस्त्यावर खड्डे पडल्याने खासदार भावना गवळींना देखील पडलेल्या खड्ड्यातून ये-जा करावा लागत असून याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. खासदारांच्या घरासमोरच भर रस्त्यावर खड्डे पडले असतील तर शहरातील इतर भागातील काय चित्र असेल याचा विचार न केलेलाच बरा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.