Sugarcane Crop : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून पंधरा लाख उसाची रोपे; शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध

Maval News : मागील वर्षी पाडेगाव २६५ या जातीची रोपे तयार करण्यात आली होती. यंदा त्यात पाडेगाव १८१३ या जातीचा ही समावेश करण्यात आला
Sugarcane Crop
Sugarcane CropSaam tv
Published On

मावळ : उसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून साखरेची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून (Sugar Factory) एप्रिल अखेरपर्यंत उसाच्या पाडेगाव जातीची सुमारे पंधरा लाख रोपे (Maval) तयार केली जातात. ही रोपे सर्व सेंद्रिय पद्धतीने केली जातात. आत्तापर्यंत कारखान्याकडून जवळपास नऊ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांना अल्प किमतीत त्याची विक्री केली जात आहे. (Live Marathi news)

Sugarcane Crop
Breaking News: आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरेंना दोन मोठे धक्के; शिंदे गटात आनंदी आनंद

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी शेतकऱ्यांना (Farmer) चांगल्या दर्जाची रोपे अल्प किमतीत उपलब्ध करून दिली जातात. मागील वर्षी पाडेगाव २६५ या जातीची रोपे तयार करण्यात आली होती. यंदा त्यात पाडेगाव १८१३ या जातीचा ही समावेश करण्यात आला आहे. साखर कारखान्याकडून तयार केलेल्या रोपांची दरवर्षी सुमारे चारशे ते पाचशे एकरावर लागवड होते. निरोगी (Sugarcane) ऊस कारखान्यावर गाळप करण्यासाठी उपलब्ध होतो. याशिवाय शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sugarcane Crop
Chatrapati Sambhajinagar : शाळेच्या बोर्डारील छत्रपती संभाजीनगर नावावर लावले काळे; गावात तणाव

९ लाख रोपे तयार 

यावर्षी पंधरा लाख इतक्या रोपांचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. आजपर्यंत जवळपास नऊ लाख रोपे तयार केली आहे आणि अजूनही काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्याला हे रोप दिले जात आहे. त्याच्या शेताची वेळोवेळी तज्ञांकडून पाहणी केली जाते. पुढील मार्गदर्शनही केले जाते. म्हणून जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने हे रोप आपल्या शेतात लावावे असे आवाहनही कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com