Sugar Factory : साखर कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी शेतात; पिकांची होतेय खराबी

Bhandara News : कारखाना तयार झाला पण आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. कारखान्यातून निघणारे केमिकल युक्त पाणी प्रोसेसिंग करून सोडायचा आहे.
Bhandara Sugar Factory
Bhandara Sugar FactorySaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मानस साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला असून (Bhandara) कारखान्यातून निघणारा खराब पाणी शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतात सोडल्याने शेतकऱ्यांचे १० हेक्टरवरील शेती नापीक झाली आहे. (Breaking Marathi News)

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात मानस साखर कारखाना (Sugar Factory) आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस याच कारखान्यात गाळप होतो. सध्या उसाचा हंगाम सुरु असल्याने साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. साखर कारखाना आपल्या भागात आला म्हटल्यावर शेतकऱ्यांचे अच्छे दिन येतील अशी आश्या शेतकऱ्यांना होती. कारखाना तयार झाला पण आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. कारखान्यातून निघणारे केमिकल युक्त पाणी प्रोसेसिंग करून सोडायचा आहे. तेही कंपनीच्या जागेत, पण कंपनी मागील १० वर्षांपासून जोर जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतात केमिकल युक्त पाणी सोडत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara Sugar Factory
Electric Shock : डीपीचे काम करताना विद्युत झटका बसल्याने दोघांचा मृत्यू

कॅनलमध्येही सोडले पाणी 

केमिकलयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती नापीक झाली असून शेतीतून पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही. शेतकऱ्यानी याची माहिती कारखाना प्रशासनाला वारंवार कळविले. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण्ही लक्ष देत नाही. आता या शेतकऱ्यांचा वालीच उरला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर या कारखान्याचा केमिकल युक्त पाणी पाटबंधारे विभागाच्या कॅनलमध्ये सोडले जाते. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अनेक शेतकऱ्यांची शेत पीक नष्ट झाली आहेत. या विषयी कारखाना प्रशासनाशी विचारणा केली असून त्यांनी आपली चूक मान्य केली व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं अश्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे सांगितले. 

Bhandara Sugar Factory
Health Department In Raid : घरात सुरु होते अनधिकृत गर्भलिंग निदान; धाड टाकत आरोग्य विभागाची कारवाई, महिला ताब्यात

शेती बंजर होण्याची भीती 

आता शेतकऱ्यांची शेती नापीक झाली असून येणाऱ्या काळात शेती बंजर होणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या मुला बाळांचा सांभाळ  कसा करणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेक शेतकरी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com