Bhandara News
Bhandara NewsSaam tv

Bhandara News : बनावट प्रमाणपत्र तयार करून काढला कामाचा टेंडर; नागरिकांनी लावले आरोप

Bhandara News : भंडारा जिल्हातील तुमसर शहर येथील तलावाच्या टेंडरच्या अटी शर्ती पूर्ण न झाल्यामुळे संबंधित विभागाला अनेकदा तक्रारी करूनही आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही
Published on

शुभम देशमुख 
भंडारा
: तुमसर शहरातील भुजली तलावचे नूतनीकरणासाठी पाच महिन्यांपूर्वी नगरपरिषदेकडून निविदा (Bhandara) प्रकाशित केल्या होत्या. परंतु, ज्या व्यक्तीला संबंधित कामाच्या ठेका दिला गेला. त्या व्यक्तीकडून ई-टेंडरिंगचे अटी शर्तीची पूर्तता न करता त्याच संबंधिताला ठेका दिला. त्यामुळे तो ठेका रद्द करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Maharashtra News)

Bhandara News
Buldhana News : ट्रॅक्टर मोर्चा प्रकरणी सुमारे १५० शेतकऱ्यांवर गुन्हा; खामगावात काढला होता मोर्चा

भंडारा जिल्हातील तुमसर शहर येथील तलावाच्या टेंडरच्या अटी शर्ती पूर्ण न झाल्यामुळे संबंधित विभागाला अनेकदा तक्रारी करूनही आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. पदाच्या दुरुपयोग करीत व्यक्तीला देण्याच्या दृष्टिकोनातून (Tender) टेंडरच्या अटी पूर्ण न करणाऱ्या व्यक्तीलाच ठेका दिला गेला आहे. तलावाचे नूतनीकरणाच्या कामाच्या अनुभव नसलेल्या, अनुभवाच्या खोटा प्रमाणपत्र देऊन टेंडर मिळविल्याची माहिती अधिकाऱ्यांना होती. तरी कोट्यवधीच्या कामाच्या ठेका दिला गेला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara News
Bribe Trap : चार हजारांची लाच घेताना आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका ताब्यात

शैलेश पडोळे यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी व संबंधित ठेका रद्द करून दुसऱ्यांदा निविदा प्रकाशित करावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर याची माहिती अधिकाऱ्यांना दिली होती. तरी सुद्धा स्वतःच्या हिताच्या दुष्टीने करोडोच्या कामाच्या कंत्राट दिला गेला आहे. त्यांची सखोली चोकशी करण्याची मागणी. शैलेश पडोळे यांनी केली असून या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व सदर कंत्राट रद्द करून दुसऱ्यांदा निविदा प्रकाशित करावे अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com