Bribe Trap : चार हजारांची लाच घेताना आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका ताब्यात

Nandurbar News : गटविम्याच्या रकमेचे देयक बिल शिंदखेडा उपकोशागार कार्यालयात सादर करावयाचे होते. तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी ठरली
Bribe Trap
Bribe TrapSaam tv
Published On

दोंडाईचा (नंदुरबार) : अक्कलकोस (ता. शिंदखेडा) येथील आदिवासी प्रकल्प विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापिकेने चार हजारांची लाच (Bribe) स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. निवृत्ती शिक्षकाचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली होती. (Tajya Batmya)

Bribe Trap
Garlic Price : लसूण ५०० रुपये किलो; आवक घटल्याने भाव गगनाला

अक्कलकोस (ता. शिंदखेडा) येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या (Ashram School) पटांगणात निवृत्त शिक्षक राजेंद्र चौधरी (वय ५८, रा. आनंदनगर, दोंडाईचा) यांचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. गटविम्याच्या रकमेचे देयक बिल शिंदखेडा उपकोशागार कार्यालयात सादर करावयाचे होते. तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी ठरली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bribe Trap
Buldhana News : ट्रॅक्टर मोर्चा प्रकरणी सुमारे १५० शेतकऱ्यांवर गुन्हा; खामगावात काढला होता मोर्चा

दरम्यान १ जानेवारीला लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक रूपाली खांडवा यांच्याकडे निवृत्त शिक्षक चौधरी यांनी तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून १ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास अक्कलकोस आश्रमशाळेत मुलींच्या वसतिगृहासमोर पंचांसमोर चार हजार रुपयांची लाच मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निरीक्षक रूपाली खांडवा यांनी ही कारवाई केली. दोंडाईचा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रूपाली खांडवा पुढील तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com