नाशिक : नाशिकमध्ये सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना दोन (Nashik) लाखाच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला दोन लाखाची लाच (Bribe) घेताना कारवाई केली आहे. (Latest Marathi News)
नाशिक येथील रहिवासी असलेल्या ईपीएफओ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईपीएफओ अधिकार्याने खाजगी पीएफ सल्लागारासोबत (CBI) अवाजवी रक्कम मागण्याचा आणि स्वीकारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या फर्मशी संबंधित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख ईपीएफओ अधिकाऱ्याने तक्रारदाराला खाजगी पीएफ सल्लागाराला लाच देण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही करण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणी सीबीआयने सापळा रचून एक व्यक्ती आणि ईपीएफओच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आली. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.