तबरेज शेख
नाशिक : कोयत्याने वार करून एक लाख ६८ हजार रुपये लुटण्याची घटना बारा दिवसांपूर्वी घडली होती. ही लुटमार करणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी (Police) जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून लुटीची रक्कम (Nashik) आणि गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केली आहे. (Live marathi News)
प्रकाश बन्सी मरसाळे हे १८ डिसेंबरला कंपनीचे उधारीचे पैसे वसूल करून मोटरसायकलने जात होते. या दरम्यान वडनेर- पाथर्डी रस्त्याने विहितगावकडे येत असताना एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांच्या मोटर सायकलला कट (Crime News) मारून थांबविले. कारच्या खाली उतरून मरसाळे यांच्याकडे असलेली १ लाख ६८ हजार रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मरसाळे यांनी विरोध केला असता चौघांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करीत बॅग हिसकावून पळ काढला होते. याप्रकरणी (Nashik Police) उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपींचा शोध सुरु होता. गुप्त बातमीदारांच्या मदतीने रोकडोबावाडीतील फरार इसमाची माहिती मिळवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. दोघे फरार हेच मरसाळे यांना लुटणारे असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. चंद्रकांत विजय काकडे, शहाबाज शफी शेख, सोनू छबू गवळी अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून लुटलेल्या रकमेपैकी एक लाख चाळीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.