Dhule Corporation : सेवानिवृत्त शिक्षकांचा महापालिकेच्या प्रवेशव्दारावर डफ वाजवून आंदोलन

Dhule News : धुळे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के थकीत फरकाच्या रकमा अद्याप मिळालेल्या नाहीत.
Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv
Published On

धुळे : सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रक्कमेसाठी आज मनपाच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी सहकुटूंब (Dhule) महानगरपालिका प्रवेशव्दारावर डफ वाजवून आवाज सुनो आंदोलन केले आहे. शिक्षकांच्या या आंदोलनाला (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील पाठिंबा दिला आहे. (Latest Marathi News)

Dhule Corporation
Eknath Khadse News: मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न; एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर निशाणा

धुळे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के थकीत फरकाच्या (Dhule Corporation) रकमा अद्याप मिळालेल्या नाहीत. तसेच जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंतच्या सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के रक्कमा धुळे मनपाने अदा केलेल्या नाहीत. मनपाकडे या निवृत्त शिक्षकांची ५० टक्के हिश्याची २ कोटी २२ लाख ५० हजार रूपये इतकी थकबाकी आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Corporation
Dhule LCB Action : सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त; धुळे एलसीबीची कारवाई

तर दररोज सकाळी वाजविणार डफ 

सेवानिवृत्त शिक्षकांनी वारंवार मागणी करून देखील थकीत वेतनाचा फरक देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली नाही. यामुळे आजचे आंदोलन करण्यात आले असून हे थकीत रक्कम लवकरात लवकर मिळावे यासाठी या आंदोलन आंदोलन तर्फे करण्यात येत आहे. जोपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत दररोज सकाळी हे आंदोलन केले जाईल, अशा इशारा यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com