Eknath Khadse News: मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न; एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर निशाणा

Jalgaon News : ओबीसीतुन सग्यासोयऱ्यांना आरक्षण देऊ हे गिरीश महाजन यांनी सांगितले असताना आता गिरीश महाजन त्या शब्दापासून मागे फिरतात.
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv
Published On

जळगाव : मनोज जरांगे पाटील यांना हे सरकार खेळवत असून ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देऊ हे गिरीश महाजन यांनीच जरांगे पाटील यांना लिहून दिलं होतं. त्यामुळेच त्यांनी उपोषण सोडलं आता (Girish Mahajan) गिरीश महाजन दिलेल्या शब्दापासून मागे फिरत असून हा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न असल्याची टीका (Eknath Khadse) एकनाथ खडसे यांनी केली आहे. (Maharashtra News)

Eknath Khadse
Ambadas Danve News: भुमरेंची एकच व्याख्या, सगळं आपल्यालाच मिळावं; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही मार्गी लागलेला नाही. याबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकार (jalgaon) खेळवत असल्याचे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Khadse
Dhule Politics : आश्वासनाची पूर्तता न करता भाजपकडून फसवणूक; ठाकरे गट शिवसैनिकांचा महापालिकेवर निषेध मोर्चा

तर महाराष्ट्रात बाका परिस्थिती

ओबीसीतुन सग्यासोयऱ्यांना आरक्षण देऊ हे गिरीश महाजन यांनी सांगितले असताना आता गिरीश महाजन त्या शब्दापासून मागे फिरतात. म्हणजे हा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. प्रामाणिकपणे (Maratha Aarkshan) आरक्षण द्यायचं असेल तर महिनाभरापूर्वीचा निर्णय आजही घेता येऊ शकतो. एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ असं सांगितलं जातं. त्यामुळे सरकारच्याच बोलण्यात विसंगती आहे. आरक्षणाबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा; अन्यथा मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रात बाका परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे खडसे यांनी सांगितले.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com