Eknath Khadse: आरक्षणाबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा...; मराठा आरक्षणावरून एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य

Eknath Khadse on Manoj Jarange: सरकारने आरक्षणाबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रात बाका परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv
Published On

Eknath Khadse on Maratha Reservation:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा मोर्चा २० जानेवारीला मुंबईत येऊन धडकणार आहे. यावरून सरकारने आरक्षणाबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रात बाका परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला.

एकनाथ खडसे म्हणाले, 'मनोज जरांगे यांना हे सरकार खेळवत आहे. ओबीसीतून सग्यासोयऱ्यांना आरक्षण देऊ हे, गिरीश महाजन यांनीच जरांगे यांना लिहून दिलं. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं. आता गिरीश महाजन त्या शब्दापासून मागे फिरत आहेत. प्रामाणिकपणे आरक्षण द्यायचं असेल तर महिनाभरापूर्वीचा निर्णय आजही घेता येऊ शकतो'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Khadse
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लान; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी

'एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ असं सांगितलं जातं. त्यामुळे सरकारच्याच बोलण्यात विसंगती आहे, असे खडसे पुढे म्हणाले.

खडसे अजित पवार गटावर काय म्हणाले?

अजित पवार यांच्या कोल्हे यांच्यावरील वक्तव्यावर खडसे म्हणाले, 'शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात आता राजकीय लढाई सुरु आहे. त्यामुळे कोण निवडून येईल हे काळच ठरवेल. दोन्ही गट वेगळे असल्यामुळे एकमेकांना निवडून न येऊ देणे हीच भूमिका दोघांची असणार आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com