Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लान; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने खास प्लान आखला आहे. या आगामी लोकसभा निवणुडकीसाठी भाजपने राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections
BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections SAAM TV
Published On

BJP Lok Sabha Election 2024 Strategy:

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुकीकडे मोर्चा वळविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने खास प्लान आखला आहे. या आगामी लोकसभा निवणुडकीसाठी भाजपने राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लान

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विशेष रणनिती आखली आहे. या आगामी निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रचारासाठी उतरणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मॅरेथॉन दौरा करणार आहे. भाजपकडून (BJP) फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या दररोज तीन सभांचे नियोजन केलं आहे. या मॅरेथॉन दौऱ्याचं लवकरच वेळापत्रक निश्चित होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections
Amethi Lok Sabha: अमेठीत यंदा स्मृती इराणी जिंकणार की राहुल गांधी विजय मिळणार? सर्वेक्षणात समोर आली माहिती

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत प्रचार करणार आहेत. मॅरेथॉन दौऱ्यातून देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीच्या विरोधात राज्य पिंजून काढणार आहेत.

BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections
Sushma Andhare: डिनो मारियाचा फोटोवरून सुषमा अंधारेंनी नितेश राणेंना डिवचलं, पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो केला ट्विट

भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज मुंबई कोअर कमिटीने बैठक आयोजित केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली आहे. मुंबईतील या बैठकीत ६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे.

केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. भाजप मुंबईत कोणते नवे प्रयोग करणार? यादृष्टीने महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मार्गदर्शन करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com