Amethi Lok Sabha: अमेठीत यंदा स्मृती इराणी जिंकणार की राहुल गांधी विजय मिळणार? सर्वेक्षणात समोर आली माहिती

Lok Sabha Survey: एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील व्हीव्हीआयपी जागांवर कोणाचा विजय होऊ शकतो, याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rahul Gandhi Vs Smriti Irani
Rahul Gandhi Vs Smriti IraniSaam Tv
Published On

Amethi Lok Sabha Survey:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. दरम्यान, एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील व्हीव्हीआयपी जागांवर कोणाचा विजय होऊ शकतो, याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जागांमध्ये अमेठी, रायबरेली, गोरखपूर, मथुरा इत्यादींचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये मोठ्या फरकाने पुढे आहेत. या सीटवर राहुल गांधी याना पुन्हा धक्का बसू शकतो, अशी शक्यता या सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahul Gandhi Vs Smriti Irani
Ghalib ki Haveli: या हवेलीत 'गालिब' आजही जिवंत आहे, त्याने विचारलेले प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत...

याशिवाय अनेक दशकांपासून गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेली मतदारसंघात सोनिया गांधी या आघाडीवर असल्याचं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. मात्र सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेसला ही जागा जिंकणे कठीण होऊ शकते, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मैनपुरीमध्ये समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव याही मोठ्या मताधिक्याने जिकंण्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

यातच रवी किशन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत ते विजय होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आले आहे. मात्र आझमगडमधील भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ ​​निरहुआ यांची जागा अडचणीत आली आहे, असं या सर्वक्षणात सांगण्यात आलं आहे.

Rahul Gandhi Vs Smriti Irani
Mumbai Crime News : विवाहितेला सासरच्यांनी जिवंत जाळलं; भांडुपमधील घटनेने खळबळ

मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी याही विजय होऊ शकतात. मात्र मतांचा फरक खूपच कमी असेल, असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. भाजपविरोधात सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या वरुण गांधी यांच्या पिलीभीत जागेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सर्व्हेनुसार वरुण गांधी यांना पिलीभीतमधून मोठी आघाडी आहे. म्हणजेच पक्षाने त्यांना पुन्हा एकदा पिलीभीतमधून उमेदवारी दिल्यास ते विजयी होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com