Ghalib ki Haveli: या हवेलीत 'गालिब' आजही जिवंत आहे, त्याने विचारलेले प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत...

Ghalib ki Haveli: एका शायराने हा प्रश्न विचारला होता, 'न था कुछ तो खुदा था.... कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझको होने ने, न होता मैं... तो क्या होता...' या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोणाला शोधला किंवा देता आलं नाही.
Ghalib ki Haveli
Ghalib ki HaveliSaam Tv
Published On

Inside Mirza Ghalib's haveli in Delhi:

अनेक दशकांआधी एका शायराने हा प्रश्न विचारला होता, 'न था कुछ तो खुदा था.... कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझको होने ने, न होता मैं... तो क्या होता...' या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोणाला शोधला किंवा देता आलं नाही. हा प्रश्न विचारला होता उर्दू-फारसी भाषेतील महान शायर मिर्झा असदुल्लाह बेग खान उर्फ मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी. आज गालिब यांची जयंती आहे.

ब्रिटिश आणि मुघल काळात स्वतःच्या शायरीतून गालिब यांनी मोठं नाव मिळवलं होतं. त्याकाळात अनेक लोक असेही होते, जे त्यांना कधीही भेटले किंवा त्यांना पाहिलं नव्हतं. मात्र त्यांनी त्यांची शायरी ऐकली होती. त्यांच्या शायरीत एक वेगळीच नशा आहे, असं त्यांच्या बाबतीत बोललं जातं. आजही कोट्यवधी लोक त्यांची शायरी वाचतात. त्यांचे अनेक शेर आजही कोणत्याही मैफिलीत रंग भरून जातात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ghalib ki Haveli
Nana Patekar News : नाना पाटेकर उतरणार राजकारणाच्या आखाड्यात? पुण्यातील 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

गालिबच्या शायरीतील वेदना ही काही प्रमाणात त्यांच्या आयुष्याची कहाणीच होती. गालिबच्या शायरीतील वेदना तुम्हाला त्याच्या हवेलीत नक्कीच दिसेल, जानवेल. मिर्झा गालिबला जाणून घ्यायचे असेल आणि समजून घ्यायचे असेल तर गालिबच्या हवेलीला एकदा नक्की भेट द्या. (Latest Marathi News)

गालिब तसे आग्रा येथील रहिवासी होते. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 27 डिसेंबर 1797 मध्ये काला महल नावाच्या ठिकाणी झाला होता. पण वयाच्या 11 व्या वर्षी गालिब दिल्लीला आले आणि त्यांनी 1812 मध्ये उमराव बेगमशी लग्न केले. दिल्ली तेच ठिकाण आहे, जिथे असदुल्ला बेग खानने गालिबच्या नावाने शायरी लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे गालिबचा जन्म दिल्लीत झाला असे म्हटले जाते.

Inside Mirza Ghalib's haveli in Delhi
Inside Mirza Ghalib's haveli in Delhi Google.com
Ghalib ki Haveli
Goyal Salt Share: मीठ बनवणाऱ्या कंपनीची कमाल! 38 रुपयांचा शेअर अवघ्या अडीच महिन्यांत 150 रुपयांच्या पार

गालिब जिथं खऱ्या अर्थाने घडले, जिथे त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कापलं ती जागा होती, जुन्या दिल्लीतील कासिम जान बल्लीमारन गल्ली येथील त्यांची हवेली. त्यांनी आपलं हे घर कधीही विकलं नाही, त्यांच्या मृत्यूनंतर ही हवेली हकीमला भेट म्हणून देण्यात आली.

Ballimaran,Ghalib ki Haveli
Ballimaran,Ghalib ki HaveliGoogel.com

गालिबच्या हवेलीत तुम्हाला केवळ शायरीचा नाही तर त्यांच्या जीवनाशी निगडित गोष्टीही पाहण्याची संधी मिळेल. हवेलीच्या आत गेल्यावर गालिबच्या संगमरवरी पुतळ्यावर अनेक पुस्तके ठेवलेली दिसतात. या हेवलीत गालिब आणि त्यांच्या कुटुंबाने वापरलेल्या वस्तू, भांडी आणि कपडे काचेच्या फ्रेममध्ये प्रदर्शित केले आहेत. हवेलीच्या भिंतींवर गालिब यांच्या उर्दू आणि हिंदीतील शायरी, गजल लिहिल्या आहेत. गालिब व्यतिरिक्त उस्ताद जौक, हकीम मोमीन खान मोमीन आणि अबू जफर यांसारख्या प्रसिद्ध शायरांचीही चित्रे इथे तुम्हाला पाहायला मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com