Parola News : कर्जबाजारी शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Jalgaon News : शेतात कापूस व इतर पीक लावलेले होते. कमी पावसाळा व शेतीमालाला भाव नसल्याने नैराश्यात होते.
Parola News
Parola NewsSaam tv
Published On

पारोळा (जळगाव) : शेतीसाठी पीककर्ज घेतले होते. मात्र कमी उत्पन्नाने गणित बिघडले. यातून दळवेल (ता. पारोळा) येथे कर्जबाजारी असलेल्या (Farmer) शेतकऱ्याने विषारी पदार्थ सेवन (Jalgaon) करून आत्महत्या केली. हि घटना  बुधवारी (३ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. (Maharashtra News)

Parola News
Kolhapur Political News : ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांना रोखठोक भूमिका महागात पडली; पदावरुन तडकाफडकी हटवलं

पारोळा तालुक्यातील दळवेल येथील दीपक बाबूलाल पाटील (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दीपक पाटील यांनी शेतात कापूस व इतर पीक लावलेले होते. कमी पावसाळा व शेतीमालाला भाव नसल्याने नैराश्यात होते. शेतातून येणाऱ्या उत्पन्नातून घेतलेले कर्ज कसे फिटणार, या गोष्टीची नेहमी चिंता करीत होते. कायम त्याच विचारात राहून त्यांनी बुधवारी (ता. ३) सकाळी टोकाचे पॉल उचलले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parola News
Unseasonal Rain : पश्चिम विदर्भात अवकाळीचा ११ लाख शेतकऱ्यांना फटका; ६७२ कोटींची शासनाकडे मागणी

दीपक पाटील यांनी राहत्या घरात शेतात पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याबाबत परिवारातील सदस्य व गावातील मंडळींनी त्यांना तत्काळ रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याबाबत हरेश्र्वर पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com