Unseasonal Rain : पश्चिम विदर्भात अवकाळीचा ११ लाख शेतकऱ्यांना फटका; ६७२ कोटींची शासनाकडे मागणी

Amravati Farmer News : राज्यातील अनेक भागात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर यादरम्यान अवकाळी पावसाने शेतकऱ्याची अतोनात नुकसान केले. यात पश्चिम विदर्भात याचा फटका अधिक बसला आहे
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: नोव्हेंबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील ११ लाख शेतकऱ्यांच्या (Farmer) ६ लाख ३२ हजार हेक्टरवरील खरीप, रब्बी पीकासह भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यात पाचही (Amravati) जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीसाठी विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी ६७१.९२ कोटींची मागणी आता शासनाकडे केली आहे. (Latest Marathi News)

Unseasonal Rain
Kolhapur Political News : ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांना रोखठोक भूमिका महागात पडली; पदावरुन तडकाफडकी हटवलं

राज्यातील अनेक भागात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर यादरम्यान अवकाळी (Rain)पावसाने शेतकऱ्याची अतोनात नुकसान केले. यात पश्चिम विदर्भात याचा फटका अधिक बसला आहे. सर्वाधिक २ लाख १६ हजार ९७३ हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. (Cotton) कापूस भिजल्याने कापसाची प्रतवारी खराब झाली. यासोबतच रब्बी हंगामातील १ लाख १७ हजार हेक्टरवरील हरभरा पिकाचे देखील नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Dhule Zilha Parishad : धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी धरती देवरे यांची बिनविरोध निवड

जिल्हा निहाय बाधित क्षेत्र
- अमरावती जिल्ह्यात २ लाख ९७ हजार ९७२ बाधित शेतकरी. १ लाख ८५ हजार ६९६ क्षेत्र बाधित. २०६.३३ लाख अपेक्षित निधी.

- अकोला जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ६९ बाधित शेतकरी. १ लाख ८८ हजार ४२४ क्षेत्र बाधित. २०७.९२ निधी अपेक्षित.

- यवतमाळ जिल्ह्यात ८४ हजार ४५१ बाधित शेतकरी. ३६ हजार ५४५ क्षेत्र बाधित. ४३.५२ लाख निधी अपेक्षित. 
- बुलढाणा जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ५८५ बाधित शेतकरी. १ लाख ५७ हजार १८० क्षेत्र बाधित. १३७.७५ अपेक्षित निधी. 

- वाशिम २ लाख ६ हजार १६४ बाधित शेतकरी. ६३ हजार ९२६ क्षेत्र बाधित. ७६.३७ लाख रुपयांचा निधी अपेक्षित.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com