Bacchu Kadu vs Ravi Rana: ...तर त्याला सरळ करण्याचं काम आम्ही करू, बच्चू कडूंच्या ऑफरवर रवी राणांचा प्रहार

Bacchu Kadu vs Ravi Rana: बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना लोकसभेची ऑफर दिल्यानंतर आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Bacchu Kadu vs Ravi Rana on Amravati Lok Sabha constituency
Bacchu Kadu vs Ravi Rana on Amravati Lok Sabha constituencySaam Tv
Published On

Bacchu Kadu vs Ravi Rana on Amravati Lok Sabha Constituency

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारसंघावर दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती लोकसभेच्या जागेवर आपला दावा ठोकला आहे. आम्ही कुणाच्याही बाजूने नाही, असं म्हणत अमरावतीची जागा प्रहारलाच मिळाली पाहिजे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bacchu Kadu vs Ravi Rana on Amravati Lok Sabha constituency
Maharashtra Politics: भाजप-शिवसेना युती तोडण्यात आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा; शिंदे गटातील बड्या नेत्याचा दावा

इतकंच नाही, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, अशी खुली ऑफर देखील बच्चू कडू यांनी दिली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या या ऑफरवर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडूंच्या ऑफरवर काय म्हणाले रवी राणा?

आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे आभार मानले आहेत. सर्वांना महायुतीचा धर्म पाळावा लागेल, आमदार बच्चू कडू आघाडी धर्म पाळणार तसेच ते लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील'

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना आम्ही नेते मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खासदार नवीन राणा यांच्याविषयी निर्णय घेतील. बच्चू कडू यांनी आम्हाला मदत केली तर त्यांना आम्ही देखील मदत करू, असं रवी राणा म्हणाले.

'....तर त्याला सरळ करू'

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केलं, कोणी वाकडा चालण्याचं काम केलं तर त्याला सरळ करण्याचं काम आम्ही करू, असा इशारा देखील रवी राणा यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी आपले आमदार सांभाळले पाहिजे. ते वेगवेगळ्या वाटेवर असून प्रहारमधून विजयी होणार, याची त्यांना शाश्वती नाही, असा टोला देखील रवी राणा यांनी लगावला आहे.

Bacchu Kadu vs Ravi Rana on Amravati Lok Sabha constituency
Jayant Patil-Rohit Pawar : रोहित पवारांसोबत पक्षांतंर्गत कलहाच्या चर्चांवर जयंत पाटील म्हणाले, 'मी गरीब माणूस...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com