धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या सदस्या धरती देवरे यांची बिनविरोध (Dhule) निवड झाली आहे, माजी अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. (Live Marathi News)
धुळे जिल्हा परिषदेच्या (Dhule ZP) अध्यक्षस्थानी असलेल्या अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिला होता. यानंतर रिक्त असलेल्या पदावर धरती देवरे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी धरती देवरे यांचा (BJP) एकमेव अर्ज होता. यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती, त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धरती देवरे या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या सुनबाई आहेत. तर गुजरातच्या नवसारी मतदार संघातील खासदार सी. आर. पाटील यांच्या त्या सुकन्या आहेत. खासदार सी. आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. धरती देवरे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.