पंढरपूर : माझ्या मुलीचे लग्न तुझ्यामुळे मोडले असा खोटा आरोप करीत एका तरूणाला हात पाय बांधून लोखंडी गज आणि काठीने मारहाण केल्याची घटना (Pandharpur) पंढरपूर तालुक्यातील पेहे गावात घडली. इतकेच नाही तर त्याच्याकडून १० लाख रुपयांची मागणी देखील करण्यात आली. (Breaking Marathi News)
गजराज पाटील असं मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. तुझ्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न (Marriage) मोडले आहे. त्याला दहा लाख रूपये खर्च झाले आहेत. ते दहा लाख रूपये मला दे असे म्हणत संशयित आरोपी शेखर नामदेव बेलदार, संतोष नामदेव बेलदार यांच्यासह इतर लोकांनी लोखंडी गज आणि काठीने घरात कोंडून दोरीने हातपाय बांधून बेदम (Crime News) मारहाण केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी विरोधात करकंब पोलिस (Police) ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या मुलीचा विवाह ४ जानेवारीला होत असून या लग्नपत्रिकेत तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे प्रेषक म्हणून छापण्यात आले आहेत. आरोपी आणि पोलिसांच्या सुमधूर संबंधाची चर्चा परिसरात सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.