MLC Election: राज्यात पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स', महायुतीचे शेकडो नगरसेवक ठाण्यात; राजकीय घडामोडींना वेग

Nashik MLC Election MahaYuti Councillors Shifted To Thane: नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाली असून महायुतीने मत फुटी टाळण्यासाठी नगरसेवकांना ठाण्यात हलवण्यास सुरुवात केली आहे.
MahaYuti leaders intensify strategy as councillors are moved to secure locations amid rising cross-voting concerns in Nashik MLC elections.
MahaYuti leaders intensify strategy as councillors are moved to secure locations amid rising cross-voting concerns in Nashik MLC elections.saam tv
Published On

नाशिक विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. गीते बंधूंनी निवडणुकीतून माघार घेतलेली असली तरी महायुतीच्या नेत्यांमधील मत विभाजनाची धाकधूक अद्याप संपलेली नाही. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता जोरदार 'हॉटेल पॉलिटिक्स' सुरू झाले असून महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी पूर्ण केली आहे.

मध्यरात्री महायुतीची खलबतं

निवडणुकीच्या रणनीतीसाठी नाशिकमध्ये काल रात्री महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्वाची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार राहुल ढिकले, पंकज भुजबळ, नितीन पवार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मत फुटू नये यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली.

MahaYuti leaders intensify strategy as councillors are moved to secure locations amid rising cross-voting concerns in Nashik MLC elections.
Raigad Crime: रायगड हादरले! मुंबईवरून गावी आलेल्या १५ वर्षीय मुलीची हत्या, धारदार शस्त्राने डोक्यावर वार नंतर गळा आवळला

मतदारांची ठाण्याच्या दिशेने ‘सहल’

महायुतीचे मतदार फुटू नयेत म्हणून आज नाशिकमधील महापालिका नगरसेवक आणि नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींना पुढील 4 दिवसांसाठी एकत्रित सहलीला नेण्यात येत आहे. या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत हे बारीक लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही नेत्यांनी स्वतःफोन करून सूचना दिल्या आहेत.

MahaYuti leaders intensify strategy as councillors are moved to secure locations amid rising cross-voting concerns in Nashik MLC elections.
पुण्यानंतर आणखी ३ जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार; पुढील ३ तास महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

गीते बंधूंची धाकधूक कायम

गीते बंधूंनी माघार घेतल्यानंतर वरवर जरी महायुतीचा रस्ता सोपा दिसत असला तरी आतून मात्र नेत्यांमध्ये मोठी धाकधूक आहे. बंडखोरीच्या छायेतून आणि गुप्तमतदानातून होणारे संभाव्य मतविभाजन टाळण्यासाठीच महायुतीने हे 'हॉटेल पॉलिटिक्स सुरू केल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com