

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तास महत्त्वाचे
विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आलाय
मराठवाड्यातील ३ जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
पुण्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे. पुण्यानंतर आता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील ३ जिल्ह्यांना ३ तास महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. तिन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान अचानक बदल झाल्याचा इशारा मुंबई विभागाने दिला आहे. या विभागाने राज्यातील प्रमुख तीन जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे. हवामान विभागाने आज शुक्रवारी संध्याकाळी ६:४५ वाजता प्रसिद्धपत्रक जारी केलं. या प्रसिद्धीपत्रकानुसार, पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट' देण्यात आलाय. या काळात संबंधित जिल्ह्यांमध्ये खालीलप्रमाणे हवामान राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने मुख्यत्वे खालील तीन जिल्ह्यांसाठी हा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना , परभणी या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांसाठी खबरदारीचे आवाहन करण्यात आलं आहे. अचानक उद्भवणाऱ्या या वादळी हवामानामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
- विजा चमकत असताना मोकळ्या मैदानात जाणे टाळायला हवे.
- नागरिकांनी लोखंडी खांब, झाडे किंवा कच्च्या पत्र्यांच्या शेडखाली आडोसा घेऊ नये.
- पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे वाहन चालवताना खबरदारी बाळगावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.