विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

Political Twist in Maharashtra: आता बातमी आहे विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतच चेकमेटचा खेळ सुरू झालाय,. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आलीय. शिंदेसेनेनं अचानक रणनीती का बदलली? शिंदेंनी बंडखोराला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय़ का घेतला? पाहूयात या रिपोर्टमधून.
Political Twist in Maharashtra:
Shinde-led Shiv Sena backs rebel candidate in Pune teachers constituencysaam tv
Published On: 

विधानपरिषदेच्य़ा शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीतच सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे आणि अमरावतीत भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे शिक्षक मतदारसंघातील बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना जाहीर पाठिंबा दिलाय. त्यामुळे महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय. मुळात भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिंदेंचेच निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी माघार घेतली होती.

मात्र अमरावतीत शिंदेसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या बंडखोरानं माघार न घेतल्यामुळे आता शिंदेसेनेनं त्याचं पुण्यात उट्ट काढलंय. आणि त्यामुळेच उदय सामंतांचे ओएसडी आणि शिंदेसेनेचे बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना अधिकृत पाठिंबा देण्याची भूमिका शिंदेसेनेनं घेतल्याचं बोललं जायतंय. शिंदेसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतर पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सचिन सानपांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

Political Twist in Maharashtra:
MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

तर दुसरीकडे अमरावती मतदारसंघात शिंदेसेनेनं पाठिंबा द्यावा अशी मागणी भाजप बंडखोरानं केलीय. शिंदेसेनेनं मात्र अमरावतीच्या जागेवरून दादांच्या राष्ट्रवादीला खिंडीत गाठलंय. अमरावतीत राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यास छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीच्या पदवीधर उमेदवाराला शिंदेसेना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलंय.

Political Twist in Maharashtra:
पुणे विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदे गटाकडून सचिन सानप यांना उमेदवारी शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का'

आता डॅमेज कंट्रोलसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी धावधाव सुरू केलीय. अमरावतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत तातडीनं अमरावतीमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र विधानपरिषदेवरून पडद्यामागे महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांनाच चेकमेट करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com