MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

Bihar MLC Election: उपेंद्र कुशवाह यांच्या 'राष्ट्रीय लोक मोर्चा' (RLM) पक्षातील बंडखोर रामपुकार सिन्हा यांनी MLC निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलीय. एनडीएला (NDA) पाठिंबा जाहीर केला आहे.
Ram Pukar Sinha withdraws from Bihar MLC election
Ram Pukar Sinha withdraws from Bihar MLC electionsaam tv
Published On: 
Summary
  • बिहार विधान परिषद निवडणुकीआधी एनडीएसाठी महत्त्वाची बातमी

  • अपक्ष उमेदवार रामपुकार सिन्हा यांनी निवडणुकीतून माघार

  • बंडखोर उमेदवाराची निवडणुकीतून माघार

महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात बंडखोर उमेदवारांनी भाजपसह महायुतीचं टेन्शन वाढवलं. दुसरीकडे बिहार विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी एनडीएला खूशखबर मिळालीय. विधानपरिषदेच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरलेले रामपुकार सिन्हा यांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत एनडीए उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आणि सत्ताधारी आघाडीसाठी प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय.

रामपुकार सिन्हा यांनी शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. सारण शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपेंद्र कुशवाहा यांच्या 'राष्ट्रीय लोक मोर्चा' (RLM) पक्षातील चारपैकी तीन आमदारांनी माधव आनंद, आलोक सिंग आणि रामेश्वर महतो यांनी रामपुकार यांना पाठिंबा दिलाय.

राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आलोक सिंग म्हणाले की, आता रामपुकार आणि हे तिन्ही आमदार एनडीएच्या उमेदवारासाठी प्रचार करतील. याआधी बंडखोर भूमिकेमुळे कुशवाहा यांनी रामपुकार यांना RLM मधून सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं.

Ram Pukar Sinha withdraws from Bihar MLC election
विधान परिषद निवडणुकीआधी भाजपची नवी रणनीती; बावनकुळे,मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी

राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाचे राज्य सरचिटणीस राहिलेले रामपुकार सिन्हा यांनी शुक्रवारी पाटणा येथे माघारी घेण्याची घोषणा केलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीतून ते माघार घेत असून एनडीए उमेदवारसाठी प्रचार करतील. या घोषनेनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अलोक सिंह म्हणाले, एनडीए हा एक परिवार आहे. एनडीए युतीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेत, जो निर्णय घेण्यात आलाय, तो सर्वांना मान्य आहे.

रामपुकार सिन्हा यांनी निवडणुकीची तयारी करण्यासाठी आपली शिक्षकपदाची नोकरी सोडली होती; म्हणूनच, आरएलएमओ (RLMO) चे प्रदेशाध्यक्ष या नात्याने आम्ही त्यांना पाठिंबा दिला. मात्र, आम्ही एनडीए (NDA) चे सैनिक आहोत आणि अशा स्थितीत एनडीए नेतृत्वाचा निर्णय सर्वोपरी आहे.

Ram Pukar Sinha withdraws from Bihar MLC election
Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

रामपुकार आरएलएमओमध्ये परतणार का?

आलोक यांनी सांगितले की, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे तिन्ही आमदार सारण शिक्षक मतदारसंघातील जेडीयू उमेदवार आनंद पुष्कर यांच्यासाठी एकत्रितपणे प्रचार करणार आहेत. रामपुकार सिन्हा देखील या मोहिमेचा भाग असतील. त्यांनी या निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केलाय. तसेच आलोक सिंग यांनी रामपुकार सिन्हा यांच्या आरएलएमओ (RLMO) मध्ये परतण्याच्या शक्यतेकडेही संकेत दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com